Supreme Court: 'जामीन हा नियम तर तुरुंगवास हा अपवाद', मुलभूत हक्कांबाबत कोर्टाने नेमकं काय म्हटलं?
Bail Laws: ‘एखाद्या आरोपीवरील आरोप हे कदाचित गंभीर असू शकतात पण कायद्याच्या चौकटीमध्ये राहून त्या खटल्याचा विचार करणे भाग असते. वेगळा दर्जा असलेल्या कायद्यांना देखील जामीन हा नियम असून तुरुंगवास अपवाद असल्याचे तत्त्व लागू होते.
नवी दिल्लीः ‘जामीन हा नियम असून तुरुंगवास हा अपवाद आहे’ हे कायदेशीर तत्त्व असून राज्यघटनेमध्ये वेगळा दर्जा असलेल्या बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्ह्याला देखील ते लागू होते, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.