फेसबुक पोस्टमध्ये 'र' ऐवजी 'क' लिहिलं तर ही बदनामी कशी होणार? : SC

Supreme Court on Anand Roy Petition
Supreme Court on Anand Roy Petitione sakal
Updated on

नवी दिल्ली : व्यापम घोटाळ्याचे (Vyapam Scam) व्हिसल ब्लोअर डॉ. आनंद राय यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आनंद राय यांना कायद्यानुसार आरोपपत्राला आव्हान देण्याचे स्वातंत्र्य दिले. अटक झाल्यानंतर आनंद राय यांना जामीन मिळाला आहे, त्यामुळे या याचिकेत अटकेपासून संरक्षण कसे द्यायचे? असे न्यायालयाने म्हटले आहे. परंतु, या प्रकरणात न्यायालयाने एक महत्वपूर्ण टिपण्णी केली आहे. फेसबुक पोस्टमध्ये 'र ऐवजी 'क' लिहिले तर त्यात बदनामीसारखं काय आहे? असा सवाल न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांनी उपस्थित केला.

Supreme Court on Anand Roy Petition
ऑनर किलींगचे प्रकरण हलक्यात घेऊ शकत नाही : सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयात व्यापम घोटाळ्याचे व्हिसल ब्लोअर डॉ. आनंद राय यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी त्या फेसबुक पोस्टचा नेमका अर्थ काय? पोस्टमध्ये आक्षेपार्ह काय आहे?, असे सवाल न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी तक्रारदाराला विचारले. त्यानंतर फेसबुक पोस्टमुळे दुखावलेल्या सीएमओ अधिकाऱ्याने सांगितले की, 'माझे नाव मरकम आहे. पण, त्यांनी जाणूनबूजून मला 'मटकम' म्हटले. त्याचा अर्थ नंपुसक, असा होतो. मी एससी/एसटी संबंधित आहे. आनंद रॉय यांनी गुन्हा केला आहे. आनंद रॉय राजकीय पक्षाशी संबंधित असून त्यांच्या राजकीय आकांक्षा आहेत'', असं तक्रारदाराने न्यायालयाला सांगितले.

काय आहे प्रकरण? -

भोपाळ क्राईम ब्रँचने आनंद राय यांना नवी दिल्लीतील हॉटेल काबली येथून ताब्यात घेतले. टीईटी पेपर लीक प्रकरणात आनंद राय आणि केके मिश्रा यांनी मरकमवर जाहीर आरोप केले होते. मरकम यांनी 27 मार्च रोजी अजक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले. आनंद राय यांनी टीईटीच्या व्हायरल स्क्रीनशॉटबाबत मरमवर प्रश्न उपस्थित केला होता. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनीही अनियमिततेचा आरोप करत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आल्याचा दावा उमेदवारांनी केला होता. यावेळी त्यांनी मरकमऐवजी मटकम असा उल्लेख फेसबुक पोस्टमध्ये केला होता. त्यावरूनच मरकम यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यावर सुनावणी घेताना न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. आम्हाला वाटले की हे प्रकरण अटकेपासून संरक्षणासाठी आहे. परंतु, याचिकाकर्त्याला अटक करण्यात आली आहे आणि त्याला जामीनही मिळाला आहे. आरोपपत्र दाखल केल्यावर आम्ही त्यांना आव्हान देण्याचे स्वातंत्र्य देऊ, असं न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()