Pune Porsche Accident: अल्पवयीन आहे म्हणून काय झालं? उत्तराखंडमधील एकाला जामीन नाकारला, पुण्यात वेगळा न्याय कशामुळे

Bail To Juvenile: सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले की, “रेकॉर्डवर ठेवलेल्या पुराव्यांचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर, आम्ही उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास इच्छुक नाही.”
Pune Porsche Accident
Pune Porsche AccidentEsakal
Updated on

उत्तराखंडमधील एका शाळेत आपल्या 14 वर्षीय वर्गमित्रिणीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या विद्यार्थ्याला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या व्हिडिओमुळे झालेल्या अपमानामुळे मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, पुण्यामध्ये दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलाच्या कारने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. यामध्ये गाडी चालवणारा मुलगा अल्पवयीन होता. तसेच तो दारू प्यायला होता. असे असूनही न्यायालयाने याप्रकारणातील अल्पवयीन आरोपीला जामिन दिला होता.

न्यायालयांच्या या दोन वेगवेगळल्या निर्णयामुळे दोन्ही प्रकरणांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

पुणे अपघात

उत्तराखंड प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयानंतर पुणे अपघात प्रकरणाची चर्चा अधिक तीव्र झाली असून, त्यात पोर्शे कारची धडक देत दोन जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला केवळ ३०० निबंध लिहायला लावत आणि इतर अटींसह जामिन मंजूर केला. तरी या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. उत्तराखंडचे प्रकरण पुण्याच्या बाबतीतही उदाहरण ठरू शकते.

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident: करोडोंची कार वापरणाऱ्या अग्रवालने सतराशे रुपयांसाठी रखडवलेले पोर्शेचे रजिस्ट्रेशन

उत्तराखंड प्रकरण

या वर्षी 10 जानेवारी रोजी, हरिद्वारच्या बाल न्यायालयाने उत्तराखंडमधील शाळेतील अश्लील व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी मुलाचा जामीन अर्ज फेटाळला होता. आयपीसीच्या कलम 305 आणि 509 आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 13 आणि 14 अंतर्गत मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने बाल न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्यानंतर आरोपीच्या आईने माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथेही उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला दिलासा दिला नव्हता. जामीन देण्यास नकार देताना उच्च न्यायालयाने मुलाला 'अनुशासनहीन मूल' म्हटले होते.

Pune Porsche Accident
Pune Accident: ...म्हणून मी माझ्या मुलाची शाळा बदलली; आरोपी तरुणाबाबत प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

सर्वोच्च न्यायालयात काय झाले?

ज्येष्ठ वकील लोकपाल सिंह यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की मुलाचे पालक त्याची काळजी घेण्यास तयार आहेत, त्याला बालगृहात ठेवू नये आणि त्याचा ताबा त्याच्या आईकडे द्यावा. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी आणि न्यायमूर्ती पंकज मिथल यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाची पडताळणी करताना मुलाला जामीन नाकारण्याचा निर्णय योग्य ठरवला.

आरोपी मुलाचे अपील फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले की, “रेकॉर्डवर ठेवलेल्या पुराव्यांचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर, आम्ही उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास इच्छुक नाही.”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.