Supreme Court : कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्ससंबंधी याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले खडे बोल

Supreme Court on side effects of COVID-19 vaccines : सर्वोच्च न्यायालयाने कोरोना व्हॅक्सिनच्या साइड इफेक्ट्संबंधीची याचिका फेटाळून लावली आहे.
Supreme Court on side effects of COVID-19 vaccines
Supreme Court on side effects of COVID-19 vaccines
Updated on

सर्वोच्च न्यायालयाने कोरोना व्हॅक्सिनच्या साइड इफेक्ट्संबंधीची याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेत कोरोना लस घेतल्याने काही साइड इफेक्ट दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला होता.

मात्र सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. जे. बी. पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने ही याचिका फक्त सनसनाटी निर्माण करण्यासाठी केल्याचे म्हटले आहे. तसेच तुम्ही लस घेतली नसती तर काय दुष्परिणाम झाले हे देखील लक्षात घ्या. तसेच ही याचिका फक्त सनसनाटी निर्माण करण्यासाठी असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.

जस्टिस पारडीवाला यांनी याचिकाकर्त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही लस घेतली आहे का? तुम्हाला काही झालं का, यावर याचिकाकर्त्या वकिलाने लस घेतल्याचे मान्य केले. पण कोणतेही साइड इफेक्ट्स झाले नसल्याचे सांगितले. यावर खंडपीठाने ही याचिका फक्त सनसनाटी निर्माणकरण्याचा प्रयत्न वाटत असल्याचे सांगत ही याचिका फेटाळली.

Supreme Court on side effects of COVID-19 vaccines
Nobel Prize 2024 : फिज़िक्समध्ये जॉन जे. हॉपफील्ड आणि जेफ्री ई. हिंटन यांना नोबेल जाहीर; दोघांनी बनवलं अनोखं न्युरल नेटवर्क

प्रिया मिश्रा आणि इतर याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी करण्यात आली होती की, मेडिकल तज्ज्ञांच्या एक समितीकडून एस्ट्राजेनेकाच्या कोविडशील्ड वॅक्सिन आणि त्याच्या साईड इफेक्ट्स तसेच त्याचा जीवीतास धोक्याची तपासणी करवून घ्यावी. या याचिकेत सर्वोच्च न्यायालयासमोर ही मागणी देखील करण्यात आली होती की या समितीमध्ये दिल्लीतील एम्सचे डायरेक्टर आणि रिटायर सर्वोच्च न्यायालयाचे जज यांचा समावेश असावा, जेणेकरून लसीपासूनच्या धोक्यांचा अभ्यास केला जाऊ शकेल. यासोबतच याचिकेत मागणी करण्यात आली होती की, या वॅक्सिनमुळे ज्या लोकांचे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी वॅक्सिन डॅमेज पेमेंट सिस्टम स्थापन केले जावे ज्यामध्ये नुकसान भपपाईची व्यवस्था केलेली असेल.

Supreme Court on side effects of COVID-19 vaccines
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी; गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.