AAP Delhi Office : सुप्रीम कोर्टाचा 'आप'ला दिलासा! मुख्यालय रिकामे करण्यास दिला दहा ऑगस्टपर्यंत वेळ

AAP Delhi Office News : पक्षाचे मुख्यालय रिकामे करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने याआधी 'आप' ला १५ जूनपर्यंत मुदत दिली होती
supreme court extends deadline for AAP to vacate delhi office till 10 august marathi news
supreme court extends deadline for AAP to vacate delhi office till 10 august marathi news
Updated on

नवी दिल्ली, ता. १०: सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाला त्यांचे दिल्लीतील मुख्यालय रिकामे करण्यासाठी १० ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे. ज्या जागेवर 'आप' चे मुख्यालय आहे, ती जागा दिल्ली उच्च न्यायालयाला देण्यात आली आहे. उच्च न्यायालयास जागा देण्यात विलंब होत असल्याने मोठे नुकसान होत आहे. अशा स्थितीत आता देण्यात येणारी मुदत ही शेवटची आहे, अशी टिप्पणी न्यायाधीश विक्रम नाथ आणि न्यायाधीश संदीप मेहता यांच्या खंडपीठाने सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी केली.

पक्षाचे मुख्यालय रिकामे करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने याआधी 'आप' ला १५ जूनपर्यंत मुदत दिली होती. मात्र लोकसभा निवडणुकीचे कारण देत कार्यालय रिकामे करण्यासाठीची मुदत वाढवून देण्याची विनंती पक्षाने केली होती. ही विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली होती. उच्च न्यायालयाला देण्यात आलेल्या प्लॉटवर एका पक्षाने कब्जा केला असल्याचा मुद्दा सर्वप्रथम उच्च न्यायालयाकडून सर्वोच्च न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आला होता.

supreme court extends deadline for AAP to vacate delhi office till 10 august marathi news
Maharashtra Lok Sabha Election Winners Full List : महाराष्ट्राने भाकरी फिरवली! मविआचा महायुतीवर मोठा विजय; जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

हा राजकीय पक्ष प्लॉट सोडण्यास तयार नसल्याने उच्च न्यायालयाला विस्तार करण्यास अडथळे येत असल्याचे सरन्यायाधीशांच्या खंडपीठाला सांगण्यात आले होते. यावर संबंधित भूखंड २०१५ मध्ये आपल्याला तर २०२० मध्ये उच्च न्यायालयाला देण्यात आला असल्याचा युक्तिवाद 'आप' कडून करण्यात आला होता. 'आप' हा राष्ट्रीय पक्ष असल्याने अन्य राष्ट्रीय पक्षाप्रमाणे त्याला मोठा भूखंड प्राप्त होण्याचा अधिकार असल्याचा दावा देखील अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाकडून करण्यात आला होता.

supreme court extends deadline for AAP to vacate delhi office till 10 august marathi news
Bypolls : लोकसभेनंतर आता सात राज्यात विधानसभेची रणधुमाळी! 'या' 13 जागांसाठी 10 जुलैला होणार पोटनिवडणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.