Delhi New: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ते गेल्या काही महिन्यांपासून अटकेत होते. मनीष सिसोदिया हे तब्बल १७ महिन्यानंतर तुरुंगाबाहेर आले आहेत. मद्य घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आणि ईडी सिसोदिया यांची चौकशी करत आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने नियमित जामीन मंजूर केला आहे.
मनीष सिसोदिया यांना जामीन मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. आपचे कार्यकर्त्यांनी पेढे-मिठाई वाटण्यास सुरुवात केली आहे. आप नेते संजय सिंग यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांना पेढे वाटण्यात आले आहेत. दरम्यान, कोर्टाने मनीष सिसोदिया यांना पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, साक्षीदारांवर दबाव न आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.