Arvind Kejriwal Bail: मुख्यमंत्री म्हणून कुठेच सही करता येणार नाही; जामीन दिला पण 'या' अटींनी केजरीवालांचे हात बांधले

Supreme Court: कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी CBI ने केजरीवालांना अटक केली होती. १७७ दिवसांनंतर अरविंद केजरीवाल जेलच्या बाहेर येणार आहेत. १० लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर केजरीवाल यांना जामीन मिळाला आहे.
cm arvind kejriwal
cm arvind kejriwalSakal
Updated on

AAP Leader Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये केजरीवाल यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. तब्बल १७७ दिवसांनंतर केजरीवाल हे तुरुंगातून बाहेर येणार आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने कथित अबकारी धोरण घोटाळ्यात दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रदीर्घ काळाचा तुरुंगवास अन्यायकारक असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.