Supreme Court on Stray Dogs Issue : भटक्या कुत्र्यांना इच्छामरण देण्याबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

Supreme Court
Supreme Courtsakal
Updated on

केरळमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर बनली आहे. मागील काही महिन्यांपासून राज्यात कुत्र्यांनी माणसांवर हल्ला केल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. दरम्यान आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. येत्या १२ जुलै रोजी हे प्रकरण सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे.

केरळमधील भटक्या कुत्र्यांचा प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायलयात दाद मागण्यात आली होती. ११ जून रोजी कुत्र्यांनी ११ वर्षीय मुलाची लचके तोडत हत्या केल्याचा प्रकार घडला. या घटनेचा भीषण व्हिडीओ देखील समोर आला होता. हा व्हिडीओ सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांनी पाहावा अशी विनंती अर्जदारांकडून करण्यात आली. यानंतर अखेर हे प्रकरण १२ जुलै रोजी विचारात घेतले जाणार आहे.

प्रकरण काय आहे?

केरळ मधील कन्नूर जिल्ह्यातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हिंसक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, कन्नूरच्या जिल्हा पंचायतीने सर्वोच्च न्यायालयात भटके कुत्रे/अत्यंत धोकादायक कुत्र्यांना मानवीय पद्धतीने इच्छामरण देण्यात यावं यासाठी अर्ज दाखल केला होता. मानवांनी इच्छामरणाची मागणी केल्यानंतर ज्याप्रकारे त्रासाशिवाय मृत्यू देण्यात येतो. तसे या कुत्र्यांना ठार करण्याची मागणी करण्यात आली आली आहे.

Supreme Court
PM Modi In US : अमेरिकेच्या खासदाराची PM मोदींवर जहरी टीका! भाषणावर टाकणार बहिष्कार

अर्जात असे म्हटले होते की, ११ जून २०२३ रोजी कन्नूरमध्ये एका ११ वर्षीय ऑटिस्टिक मुलाचा भटक्या कुत्र्यांनी हत्या केली होती आणि गेल्या वर्षी केरळमधील कोट्टायम जिल्ह्यात १२ वर्षीय मुलबाबत देखील अशीच घटना घडली होती. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात त्याचाही मृत्यू झाला. संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुत्रा चावण्याच्या घटना घडल्या आहेत, असे अर्जात म्हटले होते.

Supreme Court
Yoga Day 2023 : मोदींच्या 'योगा डे'चं लागलं देशाला वेड! श्वानाने देखील केले योगासन, Video Viral

न्यायमूर्ती सुर्य कांत यांनी मौखिक विनंतीचा विचार करत या प्रकरणातची १२ जूलै या ठरलेल्या दिवशी सुनावणी होईल असे सांगितले. तसेच ७ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करायचे असल्याचे देखील ते म्हणाले. दरम्यान या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.