सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नागरीकत्व सुधारणा कायदा (Citizenship Amendment Act) किंवा CAA संबंधित एक महत्वाचा निकाल दिला आहे. या निकालात, कोर्टाने नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या कलम 6A ची घटनात्मक वैधता कायम ठेवली आहे. या निर्णयासह, न्यायालयाने आसाम समझोत्याला आधार देणारा या कलमाचा वापर करून असममध्ये 1966 आणि 1971 दरम्यान बांगलादेशातून आलेल्या अनधिकृत स्थलांतरितांना नागरिकत्वाचे अधिकार प्रदान केले आहेत.