Supreme Court: "न्यायाधीशांनी न घाबरता निकाल द्यावा"; सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी निवृत्तीपूर्वी दिला धडा

-Sanjay Kishan Kaul
-Sanjay Kishan Kaul
Updated on

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी निवृत्तीपूर्वी दिला धडा दिला आहे. न्यायमूर्ती संजय किशन कौल सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश म्हणून सहा वर्षे आणि 10 महिन्यांहून अधिक कालावधीनंतर 25 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. दरम्यान त्यांचा निरोप समारंभ घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाला 18 डिसेंबर ते 1 जानेवारी 2024 या कालावधीत सुट्टी असेल, त्यामुळे 15 डिसेंबर हा शेवटचा कामकाजाचा दिवस होता.

न्यायमूर्ती संजय किशन कौल म्हणाले, न्यायमूर्तींना घटनात्मक संरक्षण असल्याने त्यांनी निर्भय असले पाहिजे. ज्या न्यायाधीशांना घटनात्मक संरक्षण आहे त्यांनी धैर्य दाखवले नाही, तर आम्ही प्रशासनातील इतरांकडून तशी अपेक्षा करू शकत नाही.

सुप्रीम कोर्टाने कोणतीही भीती किंवा पक्षपात न करता न्याय दिला आहे आणि हे न्यायाचे मंदिर नेहमीच खुले राहिले पाहिजे असे वाटते. न्यायाधीशांचा धाडसीपणा हा खूप महत्त्वाचा घटक आहे, असे मला वाटते. जर न्यायाधीशांना त्यांच्या संवैधानिक संरक्षणासह धैर्य दाखवता येत नसेल, तर आम्ही प्रशासनाच्या इतर यंत्रणांकडून तशी अपेक्षा करू शकत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर सहिष्णुतेची पातळी कमी होत असताना लोकांनी एकमेकांच्या मतांबाबत सहिष्णुता बाळगली पाहिजे, असे न्यायमूर्ती कौल म्हणाले.

-Sanjay Kishan Kaul
Railway: ख्रिसमस अन् नववर्षानिमित्त गोव्याला जायचंय? रेल्वे सोडणार १४ विशेष गाड्या

न्यायमूर्ती कौल म्हणाले की, न्यायाधीशांचा धाडसीपणा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे ही बार असोसिएशनची जबाबदारी आहे. (Latest Marathi News)

यावेळी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती कौल यांच्याशी असलेला त्यांचा संबंध आणि त्यांचे विद्यार्थी दिवस आठवले. ७० च्या दशकाच्या मध्यातील दिवसांची आठवण करून देताना सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, आम्ही दोघेही कॉलेजमध्ये  एकत्र होतो आणि इथेही (सर्वोच्च न्यायालय) आम्ही एकमेकांसोबत सेवा केली ही माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब आहे असे मला वाटते.

-Sanjay Kishan Kaul
अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार; अजितदादा गटाला आणखी एक कॅबिनेट, दोन राज्यमंत्रिपद वाट्याला येण्याची शक्यता!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.