NEET Exam: '0.001% निष्काळजीपणा असेल तर...', NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांबाबत सर्वोच्च न्यायालयाची NTA-केंद्राला नोटीस

Supreme Court Hearing Today On NEET Exam Cancellation Petition: NEET परीक्षेत 0.001 टक्के निष्काळजीपणा असला तरी त्यावर कारवाई करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
Supreme Court Hearing Today On NEET Exam Cancellation Petition
Supreme Court Hearing Today On NEET Exam Cancellation PetitionEsakal
Updated on

NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. यादरम्यान न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) अनेक प्रश्न विचारले. NEET परीक्षेत 0.001 टक्के निष्काळजीपणा असला तरी त्यावर कारवाई करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.

यासह सर्वोच्च न्यायालयाने एनटीए आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आणि या प्रकरणी उत्तर दाखल करण्यास सांगितले.

Supreme Court Hearing Today On NEET Exam Cancellation Petition
Devendra Fadnavis: भाजपच्या कोअर पॅनलची आज बैठक; फडणवीसांचा राजीनामा स्विकारणार का?; जाणून घ्या कारणं

नीट २०२४ परिक्षेचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सुप्रीम कोर्टात आज नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी पार पडली. मोशन एज्युकेशन कोचिंगचे सीईओ नितीन विजय यांनी ही याचिका दाखल केली होती.

Supreme Court Hearing Today On NEET Exam Cancellation Petition
Kanchanjunga Express Accident: 'अपघातात कोणा हात तर कोणी पाय गमावला....', बंगाल रेल्वे अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितली संपूर्ण कहाणी

सुप्रीम कोर्टात याअगोदर १३ जून रोजी नीट २०२४ च्या निकालाला आव्हान देणाऱ्या तीन याचिकांवर सुनावणी झाली (NEET Exam) होती. परीक्षेवरील आरोपांची SIT समितीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. तसेच ४ जूनच्या निकालाच्या आधारे होणारे कॉउंसलिंग बंद करावे, अशी मागणी देखील करण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने कॉउंसलिंगवर बंदी घालण्यास नकार दिला होता. तर २३ जून रोजी पुनर्परीक्षा घेतली जाईल, असं स्पष्ट केलं होतं.

Supreme Court Hearing Today On NEET Exam Cancellation Petition
Wayanad Constituency: दक्षिण ते उत्तर सर्व 'काँग्रेसमय' होणार? प्रियांका गांधींना वायनाडमधून उतरवण्याचं कारण समजून घ्या...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.