Maharashtra Assembly Election 2024: वर्तमानपत्रात घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याविषयीचा मजकूर ३६ तासात प्रसिद्ध केला जाईल तसं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला दिले. अजित पवार गट सुप्रीम कोर्टाच्या सूचनांचे पालन करीत नसल्याचा आरोप शरद पवार गटाने केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे.