Supriya Sule: "बहिणीचं कल्याण बघणारा भाऊ प्रत्येक घरात नसतो"; सुप्रिया सुळे संसदेत असं का म्हणाल्या?

Supriya Sule In Parliament
Supriya Sule In Parliament
Updated on

Supriya Sule In Parliament: आज लोकसभेत महिला आरक्षणावर चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या विषयावर चर्चा केली. यावेळी त्यांनी बहिणीचं कल्याण बघेल, असा भाऊ प्रत्येक घरात नसतो, असं वक्तव्य केले.

महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना टोला लगावला. महिलांबाबत महिलांनीच बोलाव, असे नसते भावांना देखील बहिणीची काळजी असते, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावल्याची चर्चा आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, अमित शहा बोलले पण प्रत्येक घरात असे भाऊ नसतात जे बहिणीचं कल्याण बघतील. प्रत्येक बहीण इतकी नशीबवान नसते.

Supriya Sule In Parliament
ZP Payment Hike : जूनअखेरीस निवृत्तांना 1 जुलैची वेतनवाढ; ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेला पत्र प्राप्त

महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा देखील उल्लेख केला. आज महिला आरक्षणावर चर्चा सुरु आहे पण महाराष्ट्र भाजपचे माजी अध्यक्ष यांनी मला घरी जाऊन जेवण बनवण्याचा सल्ला दिला होता. यावर भाजपने उत्तर द्यायला हवे. भाजपचे लोक वैयक्तिक महिलांवर टीका करतात, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

Supriya Sule In Parliament
Dhangar Reservation: "मी आधी धनगर नंतर आमदार"; आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पडळकर आक्रमक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.