सोनिया-स्मृती इराणी वादावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या...

supriya sule
supriya sule
Updated on

नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या गदारोळात सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात वाद झाला. या संपूर्ण वादातून सोनिया गांधींना सभागृहाच्या बाहेर घेऊन जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नेमकं काय घडलं याबद्दल माहिती दिली.

राष्ट्रवादीच्या नेत्या सुळे म्हणाल्या की, खरे सांगायचे झाले तर, मी त्या ठिकाणी उशिरा पोहोचले त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये काय घडले याबद्दल माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्मृती इराणी म्हणतात की सोनिया गांधींनी त्यांना धमकावले, पण प्रामाणिकपणे सांगायचे तर मी तिथे उशिरा पोहोचले होते. मी तिथे पोहोचले तेव्हा सोनिया गांधी कोणाशी बोलत नव्हत्या. अनेक खासदार तेथे पोहोचले होते. खूप गदारोळ झाला, त्यांनी सांगितले की, "सोनियाजींनी मला सांगितले की त्या रमा देवी यांच्याशी बोलायला गेल्या होत्या आणि त्या बोलत होत्या आणि मग खूप गोंधळ झाला." त्यामुळे तिथे काय झाले हे कोणी सांगू शकत नाही. आज संसदेत झालेला प्रकार दुर्दैवी असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या, संसंदेतील गोष्टी तिथेच राहीले पाहिजे, असेही त्यांनी सांगितलं.

supriya sule
'त्या' वसतिगृहाला सावरकरांचेच नाव; शाहू महाराजांच्या नावाची मागणी फेटाळली

सुप्रिया सुळे यांनी पुढे सांगितले की, या घटनेच्या वेळी त्या सोनिया गांधींकडे गेल्या होत्या आणि गोंधळ पाहून मी आणि इतर खासदारांनी सोनिया गांधी यांना घरी जाण्याची दोनदा विनंती केली. त्यानंतर त्या माझ्यासोबत निघून गेल्या आणि मी त्यांना गाडीपर्यंत सोडले, त्यानंतर त्या घरी निघून गेल्या. संसद हे अत्यंत पवित्र स्थान असून, आपल्यापैकी कोणीही कोणाची दिशाभूल करू नये, असे मला वाटते. आपण सगळे इथे कामाला येतो, असे देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

supriya sule
अखेर पार्थ चॅटर्जीवर CM ममता बॅनर्जींची कारवाई, मंत्रीपदावरून हटवलं

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 12 वाजता सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर भाजप खासदार ‘सोनिया गांधी राजीनामा द्या’च्या घोषणा देत होते. त्यावेळी सोनिया गांधी सभागृहातून बाहेर जात होत्या, पण घोषणाबाजीतच सोनिया भाजप खासदार रमादेवी यांच्याकडे परतल्या आणि अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितल्याचे सांगितले. दरम्यान, सोनिया बोलत असताना रवनीत सिंह बिट्टू आणि गौरव गोगोई त्यांच्यासोबत होते. मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींनी रमा देवी यांना विचारले, "माझे नाव का घेतले जात आहे..." तेव्हा स्मृती इराणी तिथे आल्या आणि म्हणाल्या, "मॅम, मी तुम्हाला मदत करू शकते... मी तुमचे नाव घेतले होते..." तेव्हा सोनिया गांधी त्यांना म्हणाल्या, माझ्याशी बोलू नका... आले सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.