MP Suspended: लोकसभेच्या खासदारांना निलंबित करण्याचं सत्र सुरूच, महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह ४९ खासदार निलंबित

लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या आणखी काही विरोधी खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे.
MP Suspended
MP SuspendedEsakal
Updated on

लोकसभेच्या खासदारांच्या निलंबनाचे सत्र सुरू असल्याचं दिसून येत आहे. काल अनेक खासदारांना निलंबित करण्यात आलेलं होतं, त्यावरून आज विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं, त्यानंतर आजही आणखी 49 खासदारांचं निलंबन लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आलं आहे.(Latest Marathi News)

आज निलंबित झालेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. तर, लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातून आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.

MP Suspended
गडकरींच्या एका फोनवर नेपाळमधील मृत भारतीयाचा मृतदेह परत आणता आला, धम्म सहलीसाठी गेलेल्या व्यक्तीचं झालं होतं निधन

लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या आणखी काही विरोधी खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षांच्या आणखी खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.(Latest Marathi News)

आज ४१ खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय आठ राज्यसभा खासदारांनाही निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच आतापर्यंत १४१ खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. १८ डिसेंबरपर्यंत एकूण ९२ खासदारांचे निलंबन करण्यात आले होते.

MP Suspended
Uddhav Thackeray : 'मला काही हुडी, गॉगल घालून...'; ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना दिल्लीतून टोमणा

आज कोणत्या खासदारांचं निलंबन?

  • सुप्रिया सुळे

  • अमोल कोल्हे

  • मनीष तिवारी

  • शशी थरूर

  • मोहम्मद फैसल

  • कार्ती चिदंबरम

  • सुदीप बंदोपाध्याय

  • डिंपल यादव

  • दानिश अली

(Suspension of these MPs today)

MP Suspended
Maharashtra Politics: मनसे लोकसभेच्या 22 जागा लढवण्याच्या तयारीत? संभाव्य उमेदवारांची नावंही चर्चेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.