नवी दिल्ली : बदनामी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरत कोर्टानं दिलासा दिला आहे. कोर्टानं त्यांचा जामीन १३ एप्रिलपर्यंत वाढवला आहे. दोन वर्षांची शिक्षा झाल्यानं राहुल गांधींची खासदारकी लोकसभा सचिवालयानं रद्द केली आहे. यामुळं देशभरात मोठं वादंग निर्माण झालं आहे. यानंतर पुढील सुनावणी ३ मे रोजी होणार आहे.
राहुल गांधी यांनी सेशन्स कोर्टात आपल्याविरोधातील निकालाला आव्हानही दिलं आहे. यावर आता ३ मे रोजी सुनावणी होणार आहे. त्यांना आपिलासाठी ३० दिवसांची वेळ देण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी अपिलही केलं आहे. पण आता अपिलावर कोर्टानं जर राहुल गांधींना शिक्षा स्थगिती दिली नाही तर त्यांच्यावर आठ वर्षे निवडणूक लढवता येणार नाही.
सूरत कोर्टाच्या बाहेर लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर राहुल गांधींसह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचाही फोटो आहे. तसेच या पोर्स्टर्सवर फोटोंसह 'डरो मत', 'सत्यमेव जयते' असंही लिहिण्यात आलं आहे. युवक काँग्रेसच्यावतीनं ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
राहुल गांधींनी नक्की काय म्हटलं होतं?
सन २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळात कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी सर्वांची आडनावे एक समान कशी? सर्व चोरांची नावे मोदीच का असतात? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. यावरुन मोठं वादंग निर्माण झालं होतं. यानंतर राहुल गांधींविरोधात गुजरातमधील भाजपचे आमदार पुर्नेश मोदी यांनी गुजरातच्या कोर्टात खटला दाखल केला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.