नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारमध्ये गृहमंत्री राहिलेल्या सुशील कुमार शिंदे यांच्या एका विधानामुळं सध्या काँग्रेसच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. स्वतः गृहमंत्री असताना देखील आपल्याला जम्मू आणि काश्मीरमध्ये जाण्याची भीती वाटत होती, असं त्यांनी म्हटलं आहे. यावरुन काँग्रेसच्या काळात काश्मीरमधील परिस्थिती स्फोटक असल्याचं स्पष्ट झालं असून यामुळं काँग्रेसची राजकीय कोंडी झाली आहे. कारण भाजपनं यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला आहे.