Sushma Swaraj Death Anniversary : राजकारणाच्या पलीकडचं व्यक्तिमत्व..!

Sushma Swaraj
Sushma SwarajGoogle
Updated on

स्वराज यांचा विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्त्या, सर्वोच्च न्यायालयातील वकील ते केंद्रीय मंत्री हा प्रवास नुसताच संघर्षमय नसून थक्क करणारा असा आहे, म्हणूनच त्या सर्वसामान्य भारतीयांच्या आयडॉल बनल्या आहेत.

सुषमा स्वराज ह्या, वयाच्या २५ व्या वर्षी सर्व प्रथम १९७७ मध्ये हरियाणाच्या विधानसभा सदस्य म्हणून निवडूनआल्या होत्या.हरियाणाच्या विधानसभेच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर त्यांना कामगार रोजगार मंत्री पद देण्यात आले होते.नंतर , त्यांना शिक्षण, अन्न व नागरी मंत्री पद देण्यात आले. सुषमा स्वराज ह्या सर्वात पहिले १९९० साली राज्यसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. १९९६ साली झालेल्या निवडणुकीत निवडून आलेलेल्या केंद्रातील सरकारने त्यांना सूचना व प्रसारण मंत्रालय पद दिले होते. सुषमा स्वराज यांचा राजकारणातील प्रवास असाच सुरु असताना १९९८ साली त्या पहिल्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या. त्यानंतर २००४ मध्ये त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद सांभाळले आहे .

भारतीय संसदे तर्फे देण्यात येणारा ‘’सर्वोत्कृष्ट सांसद’’ पुरस्कार मिळवणाऱ्या सुषमा स्वराज ह्या पहिल्या महिला आहेत. राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्या महिलांमध्ये सुद्धा त्यांचा प्रथमक्रमांक लागतो. तसेच भारताचे परराष्ट्र मंत्री पदी पूर्णवेळ विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिलाआहेत.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज

मे २०१४ मध्ये , विदेश मंत्रालयाची सूत्रे हाती घेतल्यांनंतर , त्या मंत्रालयात एक झंझावाती पर्व सुरु झालं .त्यांनी मंत्रालयाच्या कामकाजात सकरात्मक बदल केले . त्या उत्तम प्रशासक तर होत्याच, पण त्या पलीकडेमाणुसकी जपणारे एक व्यक्तिमत्व दडलं होत. म्हणूनच त्या सगळ्यांच्या मदतीसाठी सतत तत्पर असायच्या.प्रशासकीय अधिकाऱयांवर फारसे विसंबून न राहता स्वतःच समस्येच्या मुळाशी जाऊन निग्रहानं त्या सोडवत, फालतू , अवास्तव राजशिष्टचारच्या विरोधात त्या होत्या ,त्यांनी सामान्य माणसांपासून काहीशी दूर असणारी,परराष्ट्र मंत्रालयची चौकट मोडली. आणि ती सामान्य मांणसा च्या दारा पर्यंत आणली. म्हणूनच त्यांचीकारकीर्द सामान्य माणसाला लुभावणारी आहे.

ट्विटर मंत्री

परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा ट्विटरवर सक्रिय होत्या. परदेशात समस्येचा सामना कराव्या लागणाऱ्या भारतीयांना त्यांनी तातडीने मदत पुरवली. पासपोर्ट संदर्भात असंख्य नागरिकांच्या समस्या त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सोडवल्या. ट्विटरचा प्रशासकीय कामासाठी तंत्रज्ञानाचा सकारात्मकपद्धतीने उपयोग करणाऱ्या त्या राजकारणी होत्या. त्या मध्यरात्री सुद्धा ट्विटरवर उपलब्ध असत , वनागरिकांना उत्तर देत असत.

पासपोर्ट सुविधा

त्यांनी देशभरात अनेक नवीन पासपोर्ट केंद्रे स्थापन केली , त्यामुळे सामान्य जनतेचा मोठा त्रास वाचला, वेळेचीबचत झाली. पासपोर्ट मिळण्यासाठीची किचकट, लांब लचक प्रक्रिया सुलभ करण्यात आली. कमी वेळात पासपोर्ट जनते ला उपलब्ध झाले आहेत. अनेक ऑनलाईन पोर्टल तयार करून माहिती देणं सोपं केलं. याकामी त्यांना, विदेश मंत्रालयातील उच्च अधिकारी ज्ञानेश्वर मुळे व टीमचं सहकार्य मिळालं होते. त्यांनी 'तत्काळ पास पोर्ट' ही नवीन सुविधा उपलब्ध केली. त्यांनी शेकडो लोकांना मदत केल्याच्या अनेक कहाण्या आहेत त्यातील काही उदाहरणं -

गीता आणि हमीद ची कहाणी

गीता नावाची मूक - बधीर मुलगी लाहोर स्टेशन वर सापडली होती आणि ती एका पाकिस्तानी सेवाभावीसंस्थेबरोबर अनेक वर्षे राहत होती, ती हिंदू होती. तीन महिन्यानंतर, ऑक्टोम्बर २०१५ मध्ये त्या मुलीला भारतात वापस आणलं गेलं . त्यावेळी तिच्या पालकांचा शोध सुरू होता अनेक पालकांनी तिला आपली मुलगीअसल्याचं सांगितलं . परंतु गीता त्यांना ओळखण्यास असमर्थ ठरली आणि त्यांची DNA सुद्धा मॅच होत नव्हते .

तिचे मूळ स्थान हे भारतातलं होतं, पण ते नेमकं कुठे होते आणि तिच्या आई-वडिलांचा काही पत्ता लागत नव्हता, अशा परिस्थितीत गीताला परत भारतात अनण्याची आणि तिची सगळी जबाबदारी सुषमा स्वराज यांनी घेतली. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून एक लाख रुपयाचे इनाम गीताच्या नावे दिलं आणि तिच्या लग्नाची सुद्धा जबाबदारी स्वीकारली . अशी दुसरी घटना आहे हमीद अन्सारी यांच्या बाबतीतील… हमीद अन्सारी हा तरुण इंजिनिअर आपल्या कथित गर्लफ्रेंड ला भेटण्यासाठी अफगाणिस्तान मार्गे २०१२ मध्ये पाकिस्तानमध्ये गेलेला होता. नंतर त्यालापाकिस्तानी सैन्याने पकडलं आणि २०१५ पासून तो पाकिस्तानी सैन्याच्या तुरुंगात होता, परंतु त्याच्याकडे योग्य कागदपत्र नसल्यामुळे त्याला भारतात परत येत नव्हते , तेव्हा सुषमा यांनी त्याला मदत करून भारतात सुखरूप येण्यासाठी मदत केली.

केरळी नर्स ची सुटका -

२०१४ साल, जून महिन्याच्या सुरुवातीला इराकमध्ये ‘’तिक्रित ’’शहराजवळ असलेल्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या सेहचाळीस केरळी नर्स ला इसिस ( इस्लामिक स्टेट )च्या काही अतिरेक्यांनी बंधक बनवलं. इराकी सैन्य आणि इसिस यांचे मध्ये तुंबळ युद्ध चालू होते.. ह्या मुलींच्या सुटकेसाठी सुषमाजींनी खूप प्रयत्न केले. अखेर तब्बल २३ दिवसांनी , या नर्सेस ची सुटका करण्यात आली आणि त्यांना सुखरूप भारतात आणलं . त्यासाठी नर्सेस च्या नाते वाईकांनी आणि केरळचे मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी सुषमाजी चे विशेष आभार मानले. याशिवाय सरबजीत जो, भारतीय शेतकरी पाकिस्तानी जेल मध्ये २३ वर्ष राहिला , त्याच्या कुटुंबियांना त्यांनीपाकिस्तानात जाण्यास मदत केली . मराठी माणूस , कुलभूषण जाधव यांची केस, आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेली आणि न्याय दिला, अशा शेकडो -हजारो लोकांना त्यांनी प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष मदत केली आहे.

सुषमाजी ह्या पदा पेक्षाही मोठ्या आणि राजकारणा पलीकडे , सहृदय आणि माणुसकी जपणाऱ्या होत्या .म्हणूनच आज मृत्यू नंतरही लोक त्यांचे स्मरण केल्याशिवाय राहत नाहीत . हजारो -लाखो लोकांच्या हृदयात त्यांनी जे स्थान निर्माण केलेलं आहे , त्यामुळे त्या चिरकाल स्मरणात राहतील .. !!

- हर्षद भागवत ( ‘’ सुषमा स्वराज ‘’ यांच्यावरील पुस्तकाचे लेखक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.