गोव्यातील खातेवाटपाविषयी ‘सस्पेन्स’ अद्याप कायम

मुख्यमंत्र्यांनी नवीन पद्धतीनुसार केंद्राशी सल्लामसलत करून खाती निश्‍चित करावीत,अशा सूचना आल्याने खात्यांची यादी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठवली
goa cm pramod sawant
goa cm pramod sawantsakal
Updated on

पणजी : मंत्रिमंडळाच्या शपथविधीला आठ दिवस लोटले तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे. मुख्यमंत्र्यांनी नवीन पद्धतीनुसार केंद्राशी सल्लामसलत करून खाती निश्‍चित करावीत, अशा सूचना आल्याने खात्यांची यादी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठवली आहे.

‘राज्याला खातेवाटपासंदर्भात घाई नाही. भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कामही सुरू केले आहे. त्यामुळे खातेवाटप लांबले असले तरी ते लवकरच केले जाईल’, अशी माहिती भाजपच्या संघटनविषयक नेत्याने आज दिली. मंत्र्यांत खात्यांसाठी मोठी चढाओढ सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम खाते, नगर नियोजन, पर्यटन, उद्योग आदी खात्यांसाठी अनेक मंत्री मुख्यमंत्र्यांकडे तगादा लावत आहेत. सूत्रांच्या मते, मंत्रिमंडळात रिकाम्या असलेल्या तीन जागा भरल्यानंतरच खातेवाटप निश्‍चित केले जावे, असा एक मतप्रवाह आहे. एका ज्येष्ठ मंत्र्याने मंत्र्यांच्या खात्यांसंदर्भात संपूर्ण अनभिज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘राज्यात मुख्यमंत्री वगळता कोणाला काय खाते मिळेल, यासंदर्भात काहीही माहिती नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.