Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Swati Maliwal Assault Case: बिभव कुमार यांच्यावर आप खासदार स्वाती मालीवाल यांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.
Swati Maliwal Assault Case
Swati Maliwal Assault Caseesakal
Updated on

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी पिए बिभव कुमार यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुणावण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी मागितली ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात दोन्ही बाजूंनी जवळपास २ तास युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर कोर्टाने उशिरा निकाल दिला.

बिभव कुमार यांच्यावर आप खासदार स्वाती मालीवाल यांनी गंभीर आरोप केले होते.  त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

सुनावणीच्या वेळेस पोलिसांनी सांगितले की आरोपीने महत्वाचे पुरावे नष्ट केले आहेत. त्यांनी महिला खासदाराला मारहाण का केली याचा तपास घ्यायचा आहे. त्यामुळे पोलीस कोठडीची गरज असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

तर बिभव कुमार यांच्या वकीलांनी न्यायालयात सांगितले, स्वाती मालीवाल स्वत:हून मुख्यमंत्री निवास येथे आल्या होत्या. त्यांनी कोणतीही अपॉइंटमेंट घेतली नव्हती. तर येण्याचे कारण देखील सांगितले नाही. दिल्ली पोलिसांनी चुकीच्या गोष्टी न्यायालयात मांडल्या.

Swati Maliwal Assault Case
Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी बिभव कुमारला अटक केली. पोलिसांनी रात्री 12.40 वाजता त्यांना सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणले. चौकशीनंतर बिभवला तीस हजारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सायंकाळी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

स्वाती मालीवाल 13 मे रोजी सकाळी 9 वाजता अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचल्या. बिभव कुमारने तिला मारहाण करून गैरवर्तन केल्याचा आरोप तिने केला होता. त्याचे कपडेही फाटले. स्वातीने 16 मे रोजी संध्याकाळी 6.15 वाजता दिल्ली पोलिसात एफआयआर दाखल केला होता.

Swati Maliwal Assault Case
IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.