Swati Maliwal Case : 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? बिभव कुमारचा दिल्ली पोलिसांना मेल; पुढे आली नवीनच स्टोरी

बिभव कुमारे दिल्ली पोलिसांना दिलेल्या आपल्या तक्रारीमध्ये म्हटलंय की, मालीवाल यांनी एफआयआरमध्ये जे आरोप लावले आहेत, त्यापेक्षा वस्तुस्थिती वेगळी आहे. स्वाती मालीवाल यांनी सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्यांना शिवीगाळ केली, मारहाण केली आणि खोट्या केसमध्ये फसवण्याची धमकी दिली.
Swati Maliwal Case : 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? बिभव कुमारचा दिल्ली पोलिसांना मेल; पुढे आली नवीनच स्टोरी
Updated on

नवी दिल्लीः स्वाती मालीवाल प्रकरणामुळे आम आदमी पक्षामध्ये सध्या घमासान सुरु आहे. आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमारवर गंभीर आरोप लावले आहेत. मालीवाल यांचा आरोप आहे की, त्या जेव्हा अरविंद केजरीवाल यांच्या घरी गेल्या तेव्हा बिभवने मालीवाल यांना मारहाण केली. या प्रकरणात आता बिभवने स्वाती मालीवाल यांच्याविरोधात काऊंटर तक्रार केली आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जवळचे मानले जाणारे बिभव कुमार यांनी शुक्रवारी दिल्ली पोलिसांना एक मेल केला आहे. त्यामार्फत त्यांनी त्यांची तक्रार दाखल केली. यामध्ये त्यांनी स्वतःला निर्दोष म्हटलं असून स्वाती मालीवाल ह्या केजरीवालांना इजा करणार होत्या, असं त्यात म्हटलय.

Swati Maliwal Case : 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? बिभव कुमारचा दिल्ली पोलिसांना मेल; पुढे आली नवीनच स्टोरी
PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

बिभव कुमार यांनी कोणते आरोप लावले?

बिभव कुमारे दिल्ली पोलिसांना दिलेल्या आपल्या तक्रारीमध्ये म्हटलंय की, मालीवाल यांनी एफआयआरमध्ये जे आरोप लावले आहेत, त्यापेक्षा वस्तुस्थिती वेगळी आहे. स्वाती मालीवाल यांनी सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्यांना शिवीगाळ केली, मारहाण केली आणि खोट्या केसमध्ये फसवण्याची धमकी दिली.

Swati Maliwal Case : 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? बिभव कुमारचा दिल्ली पोलिसांना मेल; पुढे आली नवीनच स्टोरी
Pune-Delhi Flight : विमानाला धडक, चौकशीसाठी पथक;‘डीजीसीए’चे तीन सदस्य पुण्यात दाखल

बिभव कुमार पुढे सांगतात, जेव्हा स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्र्यांच्या निवसस्थानामध्ये जाण्यापासून रोखलं तेव्हा त्यांनी शिव्या दिल्या. त्यांनी तिथे आरडाओरड करायला सुरुवात केली. शिवाय माझ्यावर हल्ला केल्याचंही बिभवने सांगितंल. मालीवाल यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बिभवने अशी तक्रार पोलिसांकडे दिली आहे. या तक्रारीची खातरजमा करुन पुढील कारवाई करु, असं पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.