Swati Maliwal : स्वाती मालिवाल आम आदमी पार्टी सोडणार?, स्वतःच केला खुलासा; विभव कुमारचा जामीन कोर्टाने फेटाळला

''मला माहिती होतं की या मुद्द्याचं राजकारण केलं जाईल. मी स्वतःला नियंत्रित ठेवलं होतं. मी पक्षात राहणार, कारण हा पक्ष दोन किंवा तीन माणसांचा नाही. पक्षासाठी मी घाम गाळलेला आहे.''
Swati Maliwal Rajya Sabha Membership
Swati Maliwal Rajya Sabha MembershipEsakal
Updated on

नवी दिल्लीः आम आदमी पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या स्वाती मालिवाल ह्या लवकरच पक्षाला रामराम ठोकतील, अशा चर्चा सुरु आहेत. मात्र यासंदर्भात त्यांनी स्वतःदेखील खुलासा केला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा मुद्दा मागच्या आठवड्यापासून चर्चेत आहे. मुख्यमंत्र्यांचा पीए विभव कमार याने मालिवाल यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून तो जेलमध्ये आहे.

Swati Maliwal Rajya Sabha Membership
Pune Porsche Accident: अल्पवयीन आरोपीच्या जामीनाच्या आदेशावर सही देणारे जज नव्हे तर...; याप्रकरणातही चौकशीची शक्यता

या सगळ्या प्रकारामुळे स्वाती मालिवाल आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी देतील, असं बोललं जात आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मालिवाल म्हणाल्या की, मी पक्ष सोडणार नाही. कारण दोन किंवा तीन लोकांचा हा पक्ष नाहीये. जर मी खरं बोलले नसते तर माझे आणि पक्षाचे संबंध सुधारले असते. इतक्या वाईट पद्धतीने मारहाण झालेली असताना मी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला.

मालिवाल पुढे म्हणाल्या, मला माहिती होतं की या मुद्द्याचं राजकारण केलं जाईल. मी स्वतःला नियंत्रित ठेवलं होतं. मी पक्षात राहणार, कारण हा पक्ष दोन किंवा तीन माणसांचा नाही. पक्षासाठी मी घाम गाळलेला आहे.

Swati Maliwal Rajya Sabha Membership
Pune Porsche Accident: कल्याणीनगर अपघात प्रकरणात आणखी एकाला अटक; ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी पैसे....

दरम्यान, स्वाती मालिवाल यांना मारहाण केल्याचा आरोप असणारा मुख्यमंत्र्यांचा पीए विभव कुमार याचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. दिल्लीतल्या तीस हजारी कोर्टाने त्याचा जामीन अर्ज नामंजूर केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.