Viral Video: स्विगी डिलिव्हरी एजंटची करामत, शूज चोरताना रंगेहात सापडला, पाहा व्हायरल व्हिडिओ

Swiggy Delivery Agent: दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 'एक्स'वरील अनेक युजर्सनी त्यांच्याबाबतही भूतकाळात अशा घटना घडल्या असल्याचे सांगितले.
Swiggy Delivery Agent
Swiggy Delivery AgentEsakal
Updated on

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये स्विगी इंस्टामार्ट डिलिव्हरी एजंट फ्लॅटच्या बाहेर ठेवलेले शूज चोरताना दिसत आहे. ही घटना 9 एप्रिल 2024 रोजी गुरुग्रामच्या एका फ्लॅटमध्ये घडली.

दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज रोहित अरोरा नावाच्या एका 'एक्स' यूजरने शेअर केला आहे. चोरी केलेले शूज नायकीचे असल्याचा दावाही अरोरा यांनी यावेळी केला आहे.

'एक्स'वर सीसीटीव्ही फुटेज शेअर करत अरोरा यांनी लिहिले, “Swiggy’s drop and PICK up service. एका डिलिव्हरी एजंटने नुकतेच माझ्या मित्राचे शूज (Nike) चोरला.”

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये डिलिव्हरी एजंट किराणा सामान घेऊन दरवाजापर्यंत चालत येत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्याने बेल वाजवली आणि ग्राहक दार उघडण्याची वाट पाहू लागला. इतक्यात त्याचे लक्ष घराबाहेर ठेवलेल्या चपलांच्या तीन जोड्यांकडे गेले. नंतर एका मिनिटात, कोणीतरी दरवाजा उघडतो आणि एजंटकडून पॅकेज घेतो.

त्यानंतर, तो काही सेकंदांसाठी त्याचा मोबाइल काढतो आणि दरवाजापासून दूर जातो. मग तो डोक्यावरचा कपडा काढतो आणि चेहरा पुसतो. तो काही पायऱ्या उतरतो आणि काही सेकंदानंतर माघारी येत फ्लॅटच्या बाहेरील शूज उचलतो कपड्याखाली झाकून घेऊन जातो.

Swiggy Delivery Agent
Crime News: ओयो हॉटेलमध्ये भरले 'सेक्स मार्केट', 1000-2000 रुपयांत होते मुलींची खरेदी-विक्री ; ग्राहकांमध्ये हाय प्रोफाईल नावे

हा व्हिडिओ 11 एप्रिल रोजी पोस्ट करण्यात आला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच, स्विगीच्या अधिकृत उकाउंटवरु याला उत्तर देण्यात आले.

स्विगीच्या हँडलवर लिहिले, "रोहित, आम्हाला आमच्या डिलिव्हरी पार्टनरकडून चांगल्या अपेक्षा आहेत. आम्हाला मेसेज करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकू."

पुढे रोहित अरोरा यांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची तक्रार नोंदवली. तथापि, स्विगी सपोर्टने त्यांना कॉल केला आणि सांगितले की, "ते त्यांच्या एजंटचा माग काढू शकत नाहीत. तुम्ही या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करावी."

Swiggy Delivery Agent
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन द्या; सिसोदियांची कोर्टात मागणी

दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 'एक्स'वरील अनेक युजर्सनी त्यांच्याबाबतही भूतकाळात अशा घटना घडल्या असल्याचे सांगितले. हा व्हिडिओ 11 एप्रिल रोजी पोस्ट करण्यात आला आहे. तेव्हापासून आतापर्यंत 8 लाख 78 हजार युजर्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.