नवी दिल्ली : देशभरातील टोलनाक्यांवर वाहनचालकांना ताटकळत राहावे लागते आणि ते टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHIA) नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यानुसार प्रत्येक वाहनाला १० सेकंदांमध्ये सेवा पुरविली गेलीच पाहिजे. (take the toll in ten seconds otherwise action NHIAs instructions to avoid traffic jams)
‘एनएचआयए’च्या दिशानिर्देशानुसार वर्दळीच्या तासांत महामार्गांवरील टोल नाक्यांवर लांबच लांब रांगा लागतात. वाहनचालकांना तासनतास ताटकळत राहावे लागते. हे टाळण्यासाठी प्रत्येक वाहनचालकाची टोल भरण्याची प्रक्रिया १० सेकंदांमध्ये पूर्ण करण्याची जबाबदारी टोल नाका ठेकेदारांवर असेल. ती त्यांनी पाळली नाही तर कारवाईला सामोरे जावे लागेल. या दिशा निर्देशानुसार एखाद्या टोल नाक्यावरील वाहनांची रांग १०० मीटरपेक्षा लांब असेल तर १०० मीटर पुढील वाहनांकडून टोलवसुली करता येणार नाही. जोवर ही रांग १०० मीटरच्या आत येत नाही तोवर त्यापुढील वाहनांकडून टोलवसुली न करता पुढे जाऊ द्यावे. टोल नाक्यांवर १०० मीटर अंतरावर एक पिवळी रेषा ओढावी असेही यात नमूद केले आहे. फास्टॅग प्रणाली कार्यान्वित झाल्यावर देशातील अनेक टोल नाक्यांवरील रांगा व वाहनांना ताटकळत राहण्याचे प्रकार जवळपास संपले आहेत. मात्र अजूनही ज्या नाक्यांवर मॅन्युअल टोलवसुली केली जाते, तेथे नवीन दिशानिर्देशांचे पालन करने बंधनकारक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.