इटानगर - लसीकरण मोहिमेत (Vaccination Campaign) नागरिकांनी अधिकाधिक सहभागी व्हावे आणि लशीविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी स्थानिक प्रशासकीय पातळीवरून अनेक योजना (Scheme) राबवल्या जात आहेत. विशेषत: लोकप्रिय योजनांना पुन्हा आणण्यात येत आहे. यानुसार लस घेणाऱ्यांना मोफत तांदूळ (Free Rice) देण्याची योजना प्रशासनाने आणली आणि नागरिकांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला. (Take the Vaccine Take Twenty Kilos of Rice)
या कल्पनेमागे लोअर सुभनसिरी जिल्ह्यातील याझली येथील मंडळ अधिकारी ताशी वांगचूक तोंघडोक काम करत असून त्यांनी ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणासाठी विशेष ऑफर आणली. मागील आठवड्यात त्यांनी वीस किलो तांदूळ देण्याची घोषणा केली आणि ती योजना सोमवारपासून राबवण्यात आली. याझली मंडळात आणि जिल्ह्यात अधिकाधिक लसीकरण होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगाने प्रयत्न होत असल्याचे तोंघडोक यांनी सांगितले.
आज दुपारपर्यंत सुमारे ८० लोकांनी लस घेतली आणि प्रत्येकांना तांदळाची वीस किलोची बॅग देण्यात आली. असून आमचे ध्येय याझली मंडळात २० जूनपर्यंत शंभर टक्के लसीकरण करण्याचे आहे, असे ते म्हणाले. सध्या याझली मंडळात ४५ पेक्षा अधिक वयोगटातील १३९९ नागरिक आहेत आणि सर्वांचे लसीकरण व्हावे, यासाठी प्रशासन काम करत आहे. तांदूळ योजनेमुळे नागरिकांनी लस घेण्यासाठी उत्सुकता दाखवली. नागरिक दुर्गम भागातून पायपीट करत आले आणि त्यांनी लस टोचून घेतली.
घरपोच लस घेणाऱ्यास दहा किलो तांदूळ
४५ पेक्षा अधिक वयोगटावरील नागरिकांना येत्या शुक्रवारी आणि शनिवारी घरपोच लस देण्याची योजना आहे. मात्र घरपोच लस घेणाऱ्या व्यक्तीला वीस किलोऐवजी दहा किलो तांदूळ मिळेल, असे त्यांनी नमूद केले. या कामी विवेकानंद केंद्र विद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांनी लाभार्थ्यांसाठी तांदूळ उपलब्ध करुन दिले आहे. ईशान्य भारतात लसीकरणावरून बऱ्याच अफवा पसरल्या आहेत. लस टोचल्यानंतर आजार, ॲलर्जी होत असल्याच्या अफवा पसरल्यामुळे नागरिकांकडून लस घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. दरम्यान, लसीकरण मोहिमेचे अधिकारी दिमोंग पाडुंग यांनी राज्यात ३,९५,४४५ जणांचे लसीकरण झाल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.