'नेल पॉलिश' लावल्यास महिलांची बोटं छाटणार; तालिबान्यांचा नवा फतवा

Afghanistan
Afghanistanesakal
Updated on

काबुल (अफगाणिस्तान) : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यानंतर, त्यांच्या क्रूरतेच्या बातम्या आता समोर येऊ लागल्या आहेत. तालिबान स्वतःला सुधारत असल्याचे दाखले देत असले, तरी सोशल मीडियावर शेअर केलेले व्हिडिओ आणि फोटो तालिबानचा 'खरा चेहरा' जगासमोर आणत आहे. आता तालिबानने जीन्स (Jeans) घालण्यावर बंदी घातली असून मुलींना नेल पॉलिश (Nail Polish) वापरण्यापासूनही दूर राहण्याचा सल्ला दिलाय. जे या नियमांचं पालन करणार नाहीत, त्यांना कठोर शिक्षेला सामोरं जावं लागेल, असा इशाराही दहशतवाद्यांनी दिलाय.

Summary

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर, त्यांच्या क्रूरतेच्या बातम्या आता समोर येऊ लागल्या आहेत.

'द सन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, एका अफगाण मुलाने तालिबानी क्रूरतेचा पर्दाफाश केला. त्यानं सांगितलं, की त्याला आणि त्याच्या मित्रांना जीन्स घातल्याबद्दल कठोर शिक्षा झाली. तो सांगू लागला, त्याच्या काही मित्रांसह तो काबुलमध्ये कुठेतरी जात होता, तेव्हा समोरून येणाऱ्या तालिबान्यांनी त्याला अडवलं व जीन्सला इस्लामचा अनादर असल्याचं सांगत दहशतवाद्यांनी प्रथम त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली, नंतर त्यांना बंदूक दाखवत पुन्हा अशी चूक झाल्यास ठार मारण्याची धमकीही दिली.

Afghanistan
चिनी टॅंक, अमेरिकन Guns च्या सहाय्यानं तालिबान्यांचा अफगाणवर 'कब्जा'

उंच टाचांच्या सँडलवरही बंदी

यासोबतच, तालिबान्यांनी मुली आणि महिलांना नेल पॉलिश न लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. तालिबाननं कंधारमधील महिला व मुलींसाठी एक फतवा जारी केला असून त्यात म्हटलं आहे, की नेल पॉलिश लावण्यास मनाई आहे. जर कोणी असं करताना आढळलं, तर त्याची बोटं छाटली जातील. एवढचं नाही, तर टाचांच्या सँडल घालणाऱ्या महिलांवरही बंदी घालण्यात आलीय. जेणेकरून कोणत्याही अनोळखी व्यक्तीला त्यांच्या पावलांचा आवाज ऐकू येणार नाही, असे त्या फतव्यात नमूद केलं गेलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.