Narendra Modi : पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानाने असं केलं; 'या' राज्याच्या CM ची मोदींवर टीका

PM Narendra Modi
PM Narendra Modi esakal
Updated on

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल आर. एन. रवी यांनी पंतप्रधानांकडून कोणाच्याही प्रश्नांची उत्तरे न देता तासनतास बोलण्याची कला शिकली आहे, अशी टीका तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मंगळवारी केली. (Narendra Modi news in Marathi)

PM Narendra Modi
BBC IT Survey: बीबीसी कार्यालयातील आयकर विभागाच्या सर्वेक्षणावर एडिटर्स गिल्डचं मोठं विधान; म्हटलं...

पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर अनेक आरोप आहेत, पण त्यांनी एकाही आरोपाला उत्तर दिले नाही. लोकांचा विश्वास हा त्यांच्यासाठी संरक्षक कवच आहे, असे ते म्हणतात. पण लोकांना तसे वाटत नाही.

स्टॅलिन पुढे म्हणाले की, पंतप्रधानांचे भाषण केवळ घोषणाबाजीने भरलेले होते, परंतु त्यांनी बीबीसी डॉक्युमेंट्री (2002 च्या गुजरात दंगलींवर) किंवा अदानी प्रकरणाबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. राहुल गांधी यांनी संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांचे समर्थन करताना स्टॅलिन म्हणाले की, काँग्रेस नेत्याच्या भाषणातील काही भाग सभापतींनी काढून टाकला, हे धक्कादायक आहे. शिवाय पंतप्रधान या आरोपांबद्दल एक शब्दही बोलले नाहीत.

PM Narendra Modi
PM Shri Yojana: पीएश्री योजना नेमकी आहे तरी काय?

राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे वक्तव्य संसदेच्या रेकॉर्डवरून हटवण्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, याचा अर्थ असा नाही की ते वक्तव्य लोकांच्या मनातून काढून टाकले जाऊ शकतात. सक्तवसुली संचालनालय विरोधकांना एकत्र आणत असल्याच्या पंतप्रधानांच्या वक्तव्याचा स्टॅलिन यांनी समाचार घेतला. विरोधकांविरोधात सूडाचे राजकारण करत असल्याची कबुली पंतप्रधानांनी पहिल्यांदाच संसदेत दिली आहे. ही देशासाठी चांगली गोष्ट नाही. हे लोकशाहीसाठी नक्कीच चांगले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.