Tamil Nadu CM and DMK President MK Stalin
नवी दिल्ली- केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असून त्यावरुन देशभरात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अधिवेशनात सरकार मोठा निर्णय घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे. केंद्र सरकार इंडिया शब्द हटवण्यासाठी संसदेत विधेयक आणणार असल्याची माहिती सूत्रांच्या दिली आहे. याश्च पार्श्वभूमीवर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी मोदी सरकारवर टीका केलीये.
फॅसिस्ट भाजपला विरोध करण्यासाठी बिगर-भाजप पक्षांनी इंडिया नावाची आघाडी उभी केली आहे. आता भाजप 'इंडिया' शब्दाला 'भारत'मध्ये बदलू पाहात आहेत. आपल्या सर्वांना भाजपने देशाचा विकास केला जाईल असे आश्वासन दिले होते, पण ९ वर्षांत त्यांनी काय केलं तर नाव बदललं, असं म्हणत स्टॅलिन यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
इंडिया हे नाव गुलामीचे प्रतिक असून ब्रिटिशांनी भारताला इंडिया असं नाव दिलं आहे. त्यामुळे ते नाव बदलायला हवं, अशी भूमिका भाजपची आहे. त्यामुळे भाजप याबाबत संसदेत विधेयक आणण्याची शक्यता आहे. यावरुन इंडिया आघाडीतून तीव्र प्रतिक्रिया येत आहे. 'भाजपला इंडिया आघाडीची ताकद समजली आहे. त्यामुळे त्यांना आता इंडिया शब्द खटकत आहे. निवडणुकीनंतर इंडिया भाजपला सत्तेतून हटवेल', असं स्टॅलिन म्हणाले.
इंडिया आघाडीची वाढती शक्ती पाहून भाजप घाबरला असून त्यामुळे असा निर्णय घेण्याचा घाट घातला जात असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. इंडिया आघाडीची चौथी बैठक होणार आहे. मुंबईमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीत विरोधकांची एकजूट दिसून आली होती. एकत्रित लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इंडिया आघाडीकडून प्रयत्न सुरु आहेत. बैठक आणि चर्चा सत्र सुरु आहेत.
केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान विशेष अधिवेशन बोलावले आहेत. या अधिवेशनात नेमका काय निर्णय घेण्यात येईल याबाबत संभ्रम कायम आहे. एक देश, एक निवडणूक संकल्पना राबवणे शक्य आहे का, याबाबत मत मांडण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आलीये. त्यामुळे अधिवेशनात याबाबतही निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तुर्तास, नेमकं काय होईल हे अधिवेशनाच्या वेळीच कळून येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.