Chandrayaan 4: चांद्रयान 4 मोहिमेबाबत महत्वाची अपडेट; इस्रो प्रमुखांनी सांगितला पुढचा प्लॅन

चांद्रयान ३ च्या यशस्वीतेनंतर आता चांद्रयान ४ ची देखील चर्चा सुरु झाली आहे.
Chandrayaan 4 Update
Chandrayaan 4 Updateesakal
Updated on

चेन्नई : चांद्रयान ३ च्या यशस्वीतेनंतर आता चांद्रयान ४ ची देखील चर्चा सुरु झाली आहे. दोन टप्प्यात ही मोहिम राबवण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होती. पण आता इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी याबाबत महत्वाची बातमी देताना सांगितलं की, अद्याप या मोहिमेबाबत कुठलीही गोष्ट अंतिम झालेली नाही. (Tamil Nadu ISRO chief S Somanath says Chandrayaan 4 has not been finalized yet)

चेन्नईत माध्यमांशी बोलताना सोमनाथ म्हणाले, चांद्रयान ४ मोहिम अद्याप अंतिम झालेली नाही. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुलशेखरपटनम इथं लॉन्चपॅडच्या प्रकल्पाची पायाभरणी केली. हे काम येत्या २ वर्षात पूर्ण होणार आहे. या लॉन्चपॅडवरुन ५०० किलोपर्यंतचं रॉकेट लॉन्च केलं जाऊ शकतं. (Latest Marathi News)

Chandrayaan 4 Update
Prakash Ambedkar: काँग्रेसमधील सुपारीबाजांची नावं तीन-चार दिवसांत जाहीर करणार; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

दरम्यान, यापूर्वी एस सोमनाथ यांनी सांगितलं होतं की, चांद्रयान 3 एकाच टप्प्यात प्रक्षेपित करण्यात आले. पण चांद्रयान- 4 दोन टप्प्यात प्रक्षेपित होणार आहे. दोन स्वतंत्र प्रक्षेपण चांद्रयान- 4 वाहन घेऊन जातील. तसेच यामध्ये चांद्रयान-4 मोहिमेत पाच अंतराळ यान मॉड्यूल समाविष्ट केले जातील. तसेच, दोन रॉकेटच्या मदतीने दोन टप्प्यात प्रक्षेपित केले जाईल. (Marathi Tajya Batmya)

Chandrayaan 4 Update
Raj Thackeray on NCP: "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडून येणाऱ्यांची मोळी"; राज ठाकरेंचा शरद पवारांवर घणाघात

चांद्रयान- 4 मध्ये केवळ चांद्रयान- 3 मिशनप्रमाणे लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल नसतील तर दोन अतिरिक्त मॉड्यूल देखील असतील. हे दोन मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावरील काही नमुने घेऊन पृथ्वीवर परत येतील.

Chandrayaan 4 Update
Delhi Crime: बायकोला धडा शिकवण्यासाठी बापानं घेतला २९ वर्षीय मुलाचा जीव! जिम ट्रेनर हत्येप्रकरणी मोठा खुलासा

त्याचबरोबर चांद्रयान-4 पहिल्या टप्प्यात पृथ्वीवरून प्रक्षेपित होणार आहे. यानंतर ते चंद्रावर उतरेल. चंद्रावरील सर्व कामे पूर्ण केल्यानंतर, ते पृथ्वीवर नमुने वितरीत करण्यासाठी प्रक्षेपित केले जाईल. प्रथमच प्रक्षेपणाच्या वेळी, चांद्रयान-4 चे एकूण वजन 5200 किलोग्रॅम असेल, तर जेव्हा चंद्रावरून पृथ्वीच्या दिशेने प्रक्षेपित केले जाईल तेव्हा त्याचे वजन 1527 किलो इतके ठेवलं जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.