सध्या देशभरात इलेक्ट्रिक स्कूटर पेट घेण्याच्या घटना समोर आल्या आहेत, या दरम्यान तामिळनाडूच्या तिरुपत्तूर येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीने कंपनीची सर्व्हिस आणि इलेक्ट्रिक स्कूटरची खराब कामगीरी या दोन्ही गोष्टींना वैतागून इलेक्ट्रिक स्कूटर जाळल्याचा प्रकार समोर आला. तामिळनाडूमधील अंबुरजवळ मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास रस्त्यात चार्जींग संपल्याने एका व्यक्तीने इलेक्ट्रिक स्कूटरवर पेट्रोल ओतले आणि ते पेटवून दिल्याचा प्रकार घडला.
नेमके झाले असे की, इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 181km चालेल असा कंपनीचा दावा असूनही, ती फक्त 50-60km चालते, असे अंबूर येथे राहणारे फिजिओथेरपिस्ट पृथ्वीराज गोपीनाथन यांनी इलेक्ट्रिक स्कूटर पेटवून दिल्यानंतर सांगितले आहे. ते म्हणाले की, या वर्षी जानेवारीमध्ये स्कूटर खरेदी केल्यापासून त्यांना समस्या येत होत्या. यातच कंपनीने त्यांचे मूळ गाव अंबूरऐवजी गुडियाथाम येथील आरटीओमध्ये त्याची रजिस्ट्रेशन फी भरली, त्यामुळे त्यांना प्रवास करून तिकडे जावे लागले.
दरम्यान मंगळवारी ते गुडियाथाम आरटीओमध्ये गेले आणि परत येताना, जास्तीत जास्त 60 किमी अंतर कापल्यानंतर, बाईकची बॅटरी संपली आणि ते रस्त्यात अडकून पडले. त्यांनी कंपनीला गाडी जागेवर सोडून जाण्याबद्दल विनंती केली. पण कंपनी कडून त्यांना वाट पाहाण्यास सांगण्यात आले. तसेच सायंकाळी पाचपर्यंतच टेक्निशियन पाठवतील असे कळवले.
TOI ने दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी सांगितले की, मी माझ्या असिस्टंटला दोन लिटर पेट्रोल आणण्यास सांगितले, जे मी ई-बाईकवर ओतून पेटवून दिली, असे पृथ्वीराज म्हणाले. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हे व्हिडिओ पोस्ट केले आहेत.
मी व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही मिनिटांत, एका सर्व्हिस इंजिनिअरने मला कॉल केला आणि मीडियाला कोणतीही मुलाखत न देण्याची विनंती केली आणि त्यांची ई-बाईक बदलून देण्याचे आश्वासन दिले. मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की बाईक जाळली तेव्हाच कंपनीशी माझे नाते संपले. पण त्याने एक टीम आधीच नवीन ई-बाईक घेऊन अंबुर येथील त्यांच्या क्लिनिककडे रवाना झाली असून त्यांना आज रात्री नवी बाईक देणार असल्याचे सांगीतले असे पृथ्वीराज म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.