Udhayanidhi Stalin: हायकोर्टाच्या टीकेनंतरही उदयनिधी आपल्या वक्तव्यावर ठाम; म्हणाले, आंबेडकर, पेरियार...

 Udhayanidhi Controversial Remark on Sanatana Dharma
Udhayanidhi Controversial Remark on Sanatana Dharma
Updated on

नवी दिल्ली- डीएमकेचे नेते आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा त्यांच्या सनातन धर्माविषयीच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. उदयनिधी स्टॅलिन आणि पीके शेखर यांच्यावर त्यांच्या वक्तव्याविषयी कारवाई न केल्याबाबत मद्रास हायकोर्टाने पोलिसांवर टीका केली होती. त्यानंतर उदयनिधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फूट पाडण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा किंवा विचारधारा नष्ट करण्याचा एखाद्या व्यक्तीला अधिकार नाही, अशी टीप्पणी मद्रास हायकोर्टाने केली होती. त्यानंतर उदयनिधी म्हणाले की, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे यासंदर्भात मी कायदेशीर कारवाईसाठी तयार आहे. (Tamil Nadu minister and DMK leader Udhayanidhi Stalin on Monday defended his stance on Sanatana Dharma after the Madras High Court)

 Udhayanidhi Controversial Remark on Sanatana Dharma
IND vs PAK क्रिकेट सामन्यात 'जय श्री राम'चा नारा, उदयनिधी स्टॅलिन भारतीय चाहत्यांवर संतापले

उदयनिधी म्हणाले की, मी काहीही चुकीचं बोललो नाही. मी जे बोललोय ते सत्य बोललोय आणि याला कायदेशीररीत्या तोंड देण्याची माझी तयारी आहे. मी माझं वक्तव्य बदलणार नाही. मी माझी विचारधारा सांगितली आहे. आंबेडकर, पेरियार आणि थिरुमावलवन (Thirumavalavan) यांच्यापेक्षा मी वेगळं काही बोललो नाही.

मी आज आमदार आहे, मंत्री आहे किंवा युथ विंगचा सेक्रेटरी आहे, उद्या मी नसेन, पण एक माणूस असणं खूप महत्त्वाचं आहे, असंही ते म्हणाले. आम्ही सनातन धर्माबाबत खूप दिवसांपासून बोलत आहोत. नीटचा विषय सहा वर्षे जुना आहे. सनातन हा हजारो वर्षांपासूनचा विषय आहे. आम्ही त्याला कायम विरोध करु, असं उदयनिधी म्हणाले.

 Udhayanidhi Controversial Remark on Sanatana Dharma
राष्ट्रपती विधवा असल्याने नव्या संसदेच्या उद्घाटनाला येऊ दिलं नाही, हाच तुमचा सनातन धर्म का?- उदयनिधी

दरम्यान, उदयनिधी यांनी सनातन धर्माबाबत वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ते म्हणाले होते की, सनातन हा डेंगू, मलेरिया आणि कोरोना सारखा आहे. काही गोष्टींना आपण विरोध करु शकत नाही. त्यांना कायमचेच संपवायला हवे. सनातन धर्माचे पूर्णपणे उच्चाटन करायला हवे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.