Tamil Nadu Rains Updates: तामिळनाडूत अवकाळी पावसाचा तांडव सुरू! 36 तासांपासून 800 प्रवासी अडकले, अनेक गाड्या रद्द

तामिळनाडूत आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पाऊस आणि पुराच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रेल्वेने अनेक गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये आज शाळा, महाविद्यालये आणि बँका बंद आहेत.
Tamil Nadu Rains Updates
Tamil Nadu Rains UpdatesEsakal
Updated on

हिंदी महासागरातील केप कोमोरिनजवळ निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे तमिळनाडूच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये रविवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातील श्रीवैकुंटममध्ये पुरामुळे सुमारे 800 रेल्वे प्रवासी अडकले आहेत. तिरुचेंदूर मंदिरातून चेन्नई-जाणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनचे प्रवासी कालपासून पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या श्रीवैकुंटम येथे अडकून पडले आहेत. थुथुकुडीमध्ये आतापर्यंत ५२५ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.(Latest Marathi News)

मुसळधार पाऊस आणि पुरामुळे श्रीवैकुंटमला सर्वाधिक फटका बसला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत आणि एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. तिरुचेंदूर-चेन्नई एग्मोर एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 20606) 17 डिसेंबर रोजी रात्री 8.25 वाजता चेन्नईसाठी तिरुचेंदूरहून निघाली.  (Marathi Tajya Batmya)

मुसळधार पाऊस आणि पुरामुळे तिरुचेंदूरपासून 32 किमी अंतरावर असलेल्या श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबवण्यात आली होती.यामध्ये एकूण 800 प्रवासी अडकले आहेत आणि त्यापैकी सुमारे 500 श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकावर आणि जवळपास 300 जवळच्या शाळांमध्ये थांबले आहेत, असे ते म्हणाले.

Tamil Nadu Rains Updates
Ram Temple Inauguration: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला अडवाणींना येऊ नका म्हणून सांगितलं; पण का? चंपत राय म्हणाले...

दक्षिण रेल्वेने तिरुनेलवेली-तिरुचेंदूर सेक्शनवरील श्रीवैकुंटम आणि सेदुंगनल्लूर दरम्यानची रेल्वे वाहतूक स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या भागातील रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पुरात बुडाले होते.(Latest Marathi News)

पुढील २४ ते ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पाऊस आणि पुराच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रेल्वेने १५ गाड्या रद्द केल्या आहेत, तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. चक्रीवादळामुळे विमानसेवांवरही विपरित परिणाम झाला आहे. दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये आज शाळा, महाविद्यालये आणि बँका बंद ठेवण्यात आल्या आहेत. तिरुनेलवेली, तुतीकोरीन, तेनकासी आणि कन्याकुमारीमध्ये परिस्थिती सर्वात जास्त बिघडली आहे. पुरामुळे या जिल्ह्यांतील आतापर्यंत 7500 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. (Marathi Tajya Batmya)

Tamil Nadu Rains Updates
लालकृष्ण आडवाणी- मुरली मनोहर जोशी राम लल्लाच्या प्रतिष्ठापणेसाठी येणार नाहीत; राम मंदिर ट्रस्टची माहिती

पूरस्थिती लक्षात घेता, राज्य सरकारने दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये राज्य आपत्ती निवारण दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या 250 हून अधिक जवानांना तैनात केले आहे. भारतीय हवामान खात्याने सोमवारी सांगितले की, दक्षिण तामिळनाडूच्या 39 भागात अत्यंत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. आज 19 डिसेंबर रोजी कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी आणि तेनकासी जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.(Latest Marathi News)

Tamil Nadu Rains Updates
पाच हजार हिरे, दोन किलो चांदी; हिऱ्याच्या व्यापाऱ्याने बनवलं खास 'राम मंदिर थीम' नेकलेस, पाहा Video

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.