सर्व धर्मियांसाठी एकच बनवा प्रार्थनास्थळ - तस्लिमा नासरिन

ज्ञानवापी मशिद प्रकरणावर भाष्य करताना लेखिकेनं सांगितला तोडगा
ज्ञानवापी मशिद प्रकरणावर भाष्य करताना लेखिकेनं सांगितला तोडगा
ज्ञानवापी मशिद प्रकरणावर भाष्य करताना लेखिकेनं सांगितला तोडगा
Updated on

नवी दिल्ली : आपली मत रोखठोक मांडणाऱ्या आणि त्यामुळं अनेकदा वादग्रस्त ठरलेल्या बांगलादेशी लेखिका तस्लिमा नासरीन यांना आता भारतातील ज्ञानवापी मशिदी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. धार्मिक स्थळांवरुन होणाऱ्या वादावर त्यांनी एक फॉर्म्युला सांगितला आहे. सर्व धर्मियांना प्रार्थनेसाठी एकच भव्य वास्तू उभारावी, असं त्यांनी म्हटलं आहे. (Taslima Nasreen proposes one big prayer house for all amid Gyanvapi row)

ट्विटद्वारे आपली भूमिका मांडताना नासरिन म्हणाल्या, धार्मिक स्थळांवरुन वाद होण्यापेक्षा हे चांगलं राहिलं की, एकच भव्य प्रार्थना स्थळ उभारण्यात यावं. ज्यामध्ये १० मोठ्या खोल्या असाव्यात. यांपैकी १ खोली हिंदुंसाठी (सर्व जातींसाठी), १ खोली मुस्लिमांसाठी (यामध्ये सर्व प्रकारचे गट), १ खोली ख्रिश्चनांसाठी (सर्व संप्रदाय), १ खोली बौद्धांसाठी, १ खोली शीखांसाठी, १ खोली ज्यूंसाठी, १ खोली जैनांसाठी तर १ खोली पारसी समाजासाठी ठेवावी. त्याचबरोबर या वास्तूमध्ये ग्रंथालय, मोकळं आंगण, बाल्कनी, टॉयलेट, सर्वांसाठी एक खेळाची खोली असं सर्वकाही यामध्ये असावं.

ज्ञानवापी मशिद प्रकरणावर भाष्य करताना लेखिकेनं सांगितला तोडगा
स्मृती इराणींच्या कार्यक्रमात राडा; भाजप-राष्ट्रवादी आमने सामने

पण नासरिन यांचा हा उपाय नेटकऱ्यांना पटलेला नाही. त्यांनी कमेंट करताना म्हटलं की, हिंदूंसाठी मंदिर हे प्रार्थनास्थळापेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. हे म्हणजे घरापासून दूर एक घर असल्यासारखं आहे. यामध्ये प्रार्थना, नृत्य, गायन, जेवण, गप्पा, लहान मुलांना खेळायला जागा, प्रौढांना आंघोळीसाठी मंदिराचा तलाव असं सगळं ठेवा. यावर कोणाचाही केंद्रीय नियंत्रण नसेल वरील पैकी कशाचाही कोणीही वापर करेल. यामुळं प्रार्थना स्थळाचं काम होणार नाही, असंही एका युजरनं म्हटलं आहे.

ज्ञानवापी मशिद प्रकरणावर भाष्य करताना लेखिकेनं सांगितला तोडगा
ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते - नारायण राणे

एकानं आदरपूर्वक म्हटलं की, प्रत्येकाने इतरांच्या खाजगी जागांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकारावर आक्रमण करू नये, असा पक्का करार करून वेगवेगळ्या पंथांना स्वतंत्र खाजगी जागा प्रदान करणं अधिक चांगलं आहे.

आणखी एकानं म्हटलं की, पाकिस्तान आणि बांगलादेशात याची अंमलबजावणी व्हायला हवी! तुमच्या फॉर्म्युल्याशिवाय भारतीय ठीक आहेत. भारतात बसून तुम्ही अशा प्रकारचे मोफत सल्ले देऊ शकता, कृपया बांगलादेशात किंवा पाकिस्तानमध्ये असा सल्ला देण्याचा प्रयत्न करा. नेहरूंनी व्होट बँक आणि राजकारणासाठी हिंदुस्थानला धर्मनिरपेक्ष बनवलं होतं,” असंही या युजरनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.