'जगात नकली मुस्लिम वाढावेत अशी माझी इच्छा आहे', रश्दींवरील हल्ल्यानंतर तस्लिमांनी असं का म्हटलं?

प्रख्यात लेखक सलमान रश्दी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.
Salman Rushdie Taslima Nasrin
Salman Rushdie Taslima Nasrinesakal
Updated on
Summary

प्रख्यात लेखक सलमान रश्दी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : प्रख्यात लेखक सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्यावर हल्ला करण्यात आला असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. शुक्रवारी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये (New York America) कार्यक्रम सुरू असताना रश्दींवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात रश्दींच्या डोळ्यावरही वार झाल्यानं त्यांचा एक डोळा कायमचा निकामी होण्याची भीती निर्माण झालीय.

हल्लेखोरानं रश्दींच्या पोटावर आणि गळ्यावर वार केले असून यामुळं त्यांच्या यकृतालाही गंभीर इजा झालीय. रश्दी यांचे सहकारी अँड्र्यू वायली यांनी रश्दींचा डोळा वाचणं कठीण असून त्यांच्या यकृतालाही जबर इजा झाल्याचं सांगितलंय. याच पार्श्वभूमीवर बांगलादेशी निर्वासित लेखिका तस्लिमा नसरीन यांनीही या घटनेबाबत ट्विट केलंय. तस्लिमा नसरीन (Taslima Nasrin) यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, सलमान रश्दी यांच्याबाबत असं घडू शकतं, तर इस्लामवर टीका करणाऱ्यांवरही हल्ला होऊ शकतो, असं त्यांनी नमूद केलंय.

सलमान रश्दी यांच्यावरील हल्ल्याबाबत नसरीन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, 'मला नुकतंच कळलं की सलमान रश्दींवर न्यूयॉर्कमध्ये हल्ला झाला आहे. मला खरंच आश्चर्य वाटतंय. असं होईल असं कधी वाटलं नव्हतं. रश्दी पश्चिमेकडील देशात राहत असून त्यांना 1989 पासून सुरक्षा देण्यात येत आहे. मात्र, असं असूनही त्यांच्यावर हल्ला होत असेल तर, इस्लामवर टीका करणाऱ्या कोणावरही हल्ला होऊ शकतो.'

Salman Rushdie Taslima Nasrin
देशाच्या स्वातंत्र्यात मुस्लिमांचंही योगदान, टिपू सुलतानचं बलिदान विसरू शकत नाही : ओवैसी

दुसर्‍या ट्विटमध्ये तस्लिमांनी लिहिलंय, रश्दी यांच्यावर हल्ला करणारी व्यक्ती इस्लामी असून सलमान रश्दी हे इस्लामवाद्यांचं लक्ष्य होतं. हल्लेखोर इस्लामी होता हे उघड झाल्यावर हे लोक काय म्हणतील? तो तर खरा मुस्लिम नव्हताच. ट्विटमध्ये पुढं लिहिलंय, 'सत्य हे आहे की खरे मुस्लिम त्यांच्या पवित्र लिखाणाचं धार्मिकपणे पालन करतात. ते इस्लामवर टीका करणाऱ्यांवर हल्ला करतात. तर, नकली मुस्लिम मानवतेवर विश्वास ठेवतात आणि हिंसेच्या विरोधात जातात. नकली मुस्लिम जगभर वाढावेत अशी आमची इच्छा आहे, असं सांगत त्यांनी रश्दी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध नोंदवलाय.

हादी मतार (24 वर्षे) असं हल्लेखोराचं नाव आहे. पश्चिम न्यूयॉर्कमधील चौटाका इन्स्टिटय़ूटच्या व्यासपीठावर सकाळी 10.30 वाजता रश्दींचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांचा परिचय करून दिल्यानंतर ते व्याख्यान देण्यासाठी उभे राहणार होते. याच वेळी हल्लेखोराने रश्दी यांना धक्काबुक्की करीत चाकूने वार केल्याचे वृत्त ‘द असोसिएटेड प्रेस’ने दिलं आहे. हल्ल्यानंतर रश्दी व्यासपीठावरच खाली कोसळले. यावेळी त्यांना वैद्यकीय सेवेतील हेलिकॉप्टरमधून रुग्णालयात हलविण्यात आलं.

Salman Rushdie Taslima Nasrin
Chandrashekhar Bawankule : छत्रपती सेना ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष; 'असा' आहे बावनकुळेंचा राजकीय प्रवास

ब्रिटिश नागरिक असलेल्या 75 वर्षीय सलमान रश्दी यांनी अमेरिकेमध्येही जवळपास 20 वर्षे वास्तव्य केलं आहे. विख्यात लेखक असलेल्या सलमान रश्दी यांचे ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’ कादंबरी विशेष गाजली. त्यांना ‘बुकर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलं. 1988मध्ये रश्दी यांनी ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ हे पुस्तक लिहिले होते. याच पुस्तकामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यांना जीवे मारण्यासाठी इराणकडून धमक्या दिल्या गेल्या. या वादग्रस्त पुस्तकावर इराणसह अनेक देशांनी बंदी घातली. तसेच रश्दी यांना ठार मारण्यासाठी इराणनं फतवा जारी केला होता. शुक्रवारी हल्लेखोराने रश्दी यांच्यावर 10 ते 12 वेळा सपासप वार केले. या हल्ल्याप्रकरणी 25 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.