Cyrus Mistry: ना अग्नी, ना दफन; पारशी समाजात असे केले जाते अंतिम संस्कार

पारसी लोक पर्यावरणासाठी जागृत आहेत
Cyrus Mistry
Cyrus Mistryesakal
Updated on

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण उद्योग क्षेत्राला धक्का बसला आहे. सायरस मिस्त्री रविवारी कार मधून गुजरात मधील उदवाडा मधून मुंबईला येत होते. त्या गाडीत त्यांच्या सोबत 4 लोक होते, आणि त्यामधील 2 लोकांचा मृत्यु झाला आहे, आणि 2 लोक गंभीर जखमी झाले आहेत. सायरस मिस्त्री यांच्या निधना नंतर उद्योग क्षेत्रातून दुखं व्यक्त केलं जात आहे. सायरस मिस्त्री यांचे शवविच्छेदन केल्या नंतर, त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या घरच्यांकडे दिले आहे. सांगितले जात आहे की, सायरस मिस्त्री यांचे काही नातेवाईक परदेशातून येत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सांगितल जात आहे की त्यांच्यावर विद्युत शवगृहात अंत्यसंस्कार केले जावू शकतात.

पारसी समाजाचा अंत्यविधीची पध्दत

हजारो वर्षापुर्वी पासून पारसी समाजाची अंत्यविधीची पध्दत खुप वेगळी आहे. पारसी समाजात हिंदू समाजा प्रमाणे जाळले ही जात नाही, आणि इस्लाम धर्माप्रमाणे पुरले ही जात नाही. पारसी समाजात कोणाचा मृत्यु झाला तर त्यांना स्मशानभूमी किवा कब्रिस्तानमध्ये ही घेवून जात नाहीत. तर तो मृतदेह 'टॉवर ऑफ सायलेन्स'च्या माथ्यावर आकाशाकडे सोपवला जातो. त्यानंतर गिधाडे येऊन ते मृतदेह खातात. मृतदेह गिधाडे, गरुड आणि कावळे खातात. त्यांनी सांगितले की झोरास्ट्रियन धर्मात मृतदेह जाळणे किंवा दफन करणे निसर्गाला प्रदूषित करणारे मानले जाते. गिधाडांनी शव खाणे हा देखील पारशी समाजाच्या प्रथेचा एक भाग आहे.

Cyrus Mistry
MP: "मामाचा धान्य घोटाळा": मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर विरोधकांचा हल्लाबोल

पारसी लोक असे उघड्यावर शव सोडून जाण्यामागे एक कारण आहे, दरम्यान पारसी समाजात सांगितल जाते की मृत शव अशुध्द असते. पारसी लोक पर्यावरणासाठी जागृत आहेत. यासाठी ते जाळत नाहीत. जाळल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. आणि पुरले ही जात नाहीत कारण असं केल्यामुळे जमिनीचे ही प्रदूषण होते, आणि नदीत ही सोडले जात नाही. कारण पाण्याचे प्रदूषन होते. झोरोस्ट्रिअन धर्मामध्ये, पृथ्वी, पाणी आणि अग्नि या घटकांना अतिशय पवित्र मानले जाते. पारंपारिक पारसी लोक म्हणतात की मृतदेह जाळून अंत्यसंस्कार करणे हे धार्मिक दृष्टिकोनातून पूर्णपणे अवैध आणि चुकीचे आहे.

Cyrus Mistry
"मला बेरोजगारी संपवायची आहे"; गुजरात दौऱ्यात राहुल गांधींचं आश्वासन

'टॉवर ऑफ सायलेन्स' म्हणजे काय?

एखाद्याच्या मृत्यूनंतर पारशी समाज त्याचा मृतदेह 'टॉवर ऑफ सायलेन्स' मध्ये घेऊन जातात. 'टॉवर ऑफ सायलेन्स'ला सामान्य भाषेत दख्मा असेही म्हणतात. टॉवर ऑफ सायलेन्स ही एक गोलाकार रचना आहे, ज्याच्या वर मृत शरीर सूर्यप्रकाशात ठेवले जाते.

कमी गिधडे पारशींच्या अंत्यसंस्कारात समस्या निर्माण करत आहेत

जगाच्या वाढत्या गतीने पारशी समाजाच्या लोकांनाही एका नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वास्तविक, भारतात गिधाडांची संख्या लक्षणीय रित्या कमी झाली आहे. आता शहरांमध्ये क्वचितच गिधाड दिसत आहे. अशा स्थितीत पारशी समाजाला मृत्यूनंतर प्रथा पार पाडण्यात अडचणी येत आहेत. रामियार करंजिया या पारशी पुजारी या प्रकरणी सांगतात की गिधाडे जास्त वेगाने मानवी मांस खातात. मात्र आता गिधाडं नसल्यामुळे अवघड होत आहे. गिधाडे काही तासात शव नष्ट करायचे आता, ते करायला काही दिवस लागत आहेत. यावरून काही दिवस. शव कुजत राहते आणि त्याला दुर्गंधी येऊ लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.