...अन् डोकोमोला भरपाई मिळाली

रतन टाटा हे दिलेला शब्द पाळणारे उद्योजक होते. जपानच्या ‘डोकोमो’ कंपनीने ‘टाटा टेली सर्व्हिसेस’मध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी जगात प्रथमच ‘थ्री-जी’ सेवा आणली होती.
Ratan Tata
Ratan Tatasakal
Updated on

- माधव जोशी

‘टाटा टेली सर्व्हिसेस’तर्फे ‘डोकोमो’ला २००८ मध्ये ७ हजार ६०० कोटी रुपयांचे देणे होते. सरकारने त्यास परवानगी नाकारली पण तरीही टाटांनी न्यायालयात सरकारशी भांडून ते पैसे ‘डोकोमो’ला दिले. ‘टाटा इज ट्रस्ट’ असे का म्हणतात? हे त्यातून कळले.

रतन टाटा हे दिलेला शब्द पाळणारे उद्योजक होते. जपानच्या ‘डोकोमो’ कंपनीने ‘टाटा टेली सर्व्हिसेस’मध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी जगात प्रथमच ‘थ्री-जी’ सेवा आणली होती. ‘टाटा’सोबतच्या व्यवहारासाठी ‘डोकोमो’ने मार्च २००९ मध्ये १३ हजार कोटी रुपये मोजून ‘टाटा टेली सर्व्हिसेस’चे २६ टक्के भागभांडवल घेतले; मात्र पुढील चार वर्षांत ‘टाटा टेली सर्व्हिसेस’ने नफा कमावयाचा नाही तसेच यातील अर्धी रक्कम म्हणजे ६ हजार ५०० कोटी रुपये ‘टाटा सन्स’ने डोकोमोला परत करावी अशी त्यांची अट होती.

‘टाटा टेली सर्व्हिसेस’ला तोटा झाल्यामुळे त्यावेळच्या विनिमय दरानुसार कंपनीला ७ हजार ६५० कोटी रुपये ‘डोकोमो’ला देणे लागत होते. रिझर्व्ह बँकेने तसेच केंद्रीय अर्थमंत्र्यांनीदेखील एवढी मोठी रक्कम भारताबाहेर पाठविण्यास परवानगी दिली नाही. टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनीदेखील हतबलता दर्शविली त्यामुळे ‘डोकोमो’च्या संचालकांनी रतन टाटा यांची भेट घेतल्यावर टाटा यांनी त्यांना अभूतपूर्व सल्ला दिला.

आम्ही तुमचे देणे लागत असल्यामुळे तुम्ही त्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागा असे त्यांनी सुचविले. तेथे तिसऱ्याच दिवशी टाटातर्फे ७ हजार ६५० कोटी रुपये न्यायालयात भरण्यात आले आणि न्यायालयाच्या आदेशानुसार एका महिन्यात टाटांनी ते पैसे ‘डोकोमो’ला दिले. एवढी मोठी रक्कम पणाला लावूनही तसेच सायरस मिस्त्री यांनी हतबलता दाखवूनही रतन टाटा यांनी सरकारशी लढा देऊन आपला शब्द पाळला आणि ते पैसे दिले.

टाटा समूहाची भारतीय बनावटीची पहिली इंडिका गाडी तांत्रिक चुकांमुळे अपयशी ठरली. हा व्यवसाय तोट्याचा ठरेल हे लक्षात आल्यावर ते स्वतः शिष्टमंडळासह बिल फोर्ड यांच्याकडे गेले आणि आपला मोटारीचा व्यवसाय विकत घेण्याची विनंती केली. त्या वेळी बिल फोर्ड यांनी त्यांचा अपमान करून सांगितले की, ‘मोटारीचा व्यवसाय येडागबाळ्याचे काम नसते.

तुम्हाला काहीच ज्ञान नसतानाही तुम्ही त्यात का आलात?’ या घटनेनंतर रतन टाटा इरेला पेटले आणि त्यांनी दोष सुधारून ‘इंडिका व्ही टू’ हे दुसरे मॉडेल विकसित केले आणि त्या मोटारीने भारतीय बाजारपेठेत सुमारे १७-१८ वर्षे धुमाकूळ घातला.

त्यानंतर सन २००८ मध्ये फोर्डने स्वतः बॉम्बे हाउसमध्ये येऊन रतन टाटांना विनंती केली की, आमचा जग्वार आणि लँड-रोव्हर मोटारीचा व्यवसाय तुम्ही खरेदी करा. तेव्हा रतन टाटा यांनी त्यांचा अपमान न करता त्याचीही खरेदी केली आणि तो व्यवसाय उत्तमरीत्या चालत आहे.

लेखक हे ‘टाटा टेली सर्व्हिसेस’चे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सल्लागार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.