कर्नाटकावर अस्मानी संकट; दोन दिवसात राज्याला Tauktae चक्रीवादळाचा तडाखा?

15 आणि 16 मे रोजी उत्तर कन्नड, उडुपी आणि दक्षिण कन्नडमध्ये मुसळधार पाऊस (Rainfall) पडण्याची शक्यता आहे.
Tauktae Cyclone
Tauktae Cycloneesakal
Updated on

बेळगांव (कर्नाटक) : सध्या देशावर कोरोना संकट (Coronavirus) सुरु असतानाच, आता आणखी एक नैसर्गिक संकट राज्यावर आदळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दक्षिण अरबी समुद्रात 15 ते 16 मे'च्या आसपास चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील (Karnataka) दक्षिण कन्नड, उडुपी, शिमोगा, चिक्कमंगळूर, कोडगू, म्हैसूर, हसन आणि रामनगर जिल्ह्यात 16 मे'पर्यंत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. (Tauktae Cyclone In Two Days In The State Of Karnataka)

दरम्यान, 15 आणि 16 मे रोजी उत्तर कन्नड, उडुपी आणि दक्षिण कन्नडमध्ये मुसळधार पाऊस (Rainfall) पडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर हवामानकडून उद्या 2 दिवसांचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून 16 मे रोजी कर्नाटकात वादळ येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Tauktae Cyclone
अलर्ट! Tauktae चक्रीवादळाने बदलली दिशा; राज्यात मुसळधार?

आजपासून तीन दिवस राज्यभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतात अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर टॉक्टाय चक्रीवादळ (Tauktae Cyclone) दाखल झाले असून उद्या दक्षिण भारतात दाखल होणार आहे. अरबी समुद्राच्या नैऋत्य पूर्वेकडील भागाला याचा जोराचा फटका बसणार आहे. परिणामी, किनारपट्टी जिल्ह्यात आजपासून 17 मेपर्यंत मुसळधार पाऊस पडेल, असेही हवामान खात्याकडून वर्तविले आहे. उत्तर कन्नड, उडुपी आणि दक्षिण कन्नडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Tauktae Cyclone In Two Days In The State Of Karnataka

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.