‘तौत्के’ चक्रीवादळामुळे दोन राज्यांना पुराचा धोका, जाणून घ्या अपडेट्स

सध्या काय आहे स्थिती
Signs of cyclone formation in Arabian sea
Signs of cyclone formation in Arabian sea
Updated on

नवी दिल्ली: अरबी समुद्राच्या (Arabian Sea) नैऋत्य भागात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ‘तौत्के’ (Tauktae) चक्रीवादळ (Cyclone) निर्माण झाले आहे. या वादळामुळे केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्र ही चार राज्य अलर्ट मोडवर आहेत. १८ मे ला हे वादळ गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज आहे. ‘तौत्के’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी उच्चस्तरीय बैठकही बोलवली होती. (Tauktae cyclone keral, gujarat, tamilnadu, maharashtra on high alert latest udpate)

एअरपोर्ट ऑथोरोटी ऑफ इंडिया या वादळामुळे वातावरणात जे बदल होतायत, त्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. ‘तौत्के’ चक्रीवादळामुळे तात्काळ विमानतळ बंद करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. कुठल्या भागांमध्ये किती फटका बसू शकतो, ते चित्र अजून स्पष्ट झालेले नाही.

Signs of cyclone formation in Arabian sea
मुंबईतील व्यापाऱ्यांची उद्धव ठाकरेंना कळकळीची विनंती म्हणाले...

केरळमध्ये काही भागात पाणी तुंबलं असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरु आहे. ‘तौत्के’ चक्रीवादळामुळे आज आणि उद्या गोवा-कोकणात मुसळधार पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गोवा सरकारही वादळाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी गोव्याने अग्निशमन दल आणि आपतकालीन सेवांना सज्ज ठेवले आहे. ‘तौत्के’ चक्रीवादळामुळे केरळ आणि तामिळनाडू या दोन राज्यात पुरस्थिती उदभवू शकते.

हवामान खात्याने आगामी पाच दिवसांचा अंदाज जाहीर केला असून यात गोवा आणि कोकणातील काही भागात याशिवाय रविवारी गोवा आणि दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असाही हवामान खात्याचा अंदाज आहे.

Signs of cyclone formation in Arabian sea
मुंबईत दोन ते तीन तास पाणी तुंबणारच, महापौरांचं वक्तव्य

मुंबईत पावासाचा अंदाज

अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या चक्रीवादळामुळे येत्या रविवारी मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील सर्व किनाऱ्यांवरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. शनिवारपर्यंत कमी दाबाच्या पट्ट्याचे वादळात रूपांतर होणार आहे. रविवारी मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईतील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

म्यानमारकडून नामकरण

या चक्रीवादळाचे म्यानमारने ‘तौक्ते’ असे नामकरण केले आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण आवाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या एका सरड्याचे नाव आहे. भारतीय उपखंडात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना भारतासह, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार आदी बारा देशांकडून क्रमाने नाव दिले जाते. भारतीय हवामान विभागाने भविष्यात बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या १६९ चक्रीवादळांच्या नावांची यादी जाहीर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.