टॅक्स की खंडणीवसूली? राहुल गांधींचं मोदी सरकारवर टीकास्त्र

Rahul-Gandhi
Rahul-Gandhi
Updated on

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात सातत्याने पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहेत. देशातील बहुतांश ठिकाणी पेट्रोलने शंभरी गाठली आहे. कोरोनाच्या संकटामध्ये आधीच जनसामान्य लोक भरडून निघाले असताना त्यातच इंधन दरवाढीने सामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंधन दरवाढीवरून केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे. सार्वजनिक वाहनांसाठी लांबचलांब लागलेल्या रांगा, कोरोनाच्या प्रतिबंधामुळे नव्हे तर पेट्रोल आणि डिझेलचे दर कडाडल्यामुळे आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

Rahul-Gandhi
अजित पवार, अनिल परबांच्या CBI चौकशीची चंद्रकांत पाटलांची मागणी
Rahul-Gandhi
तृतीयपंथीयांच्या शिक्षणासाठी वसईत 'ट्रान्सजेंडर शाळा'

गेल्या काही आठवड्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये सतत वाढ होत आहे. या दरवाढीतून केंद्र सरकारला अकारी शुल्क आणि इतर करांमधून कोट्यवधी रुपये मिळत असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कार्यकक्षेत आणावेत, अशी मागणीही केली आहे. अशात, काल दिल्लीतील मेट्रो स्थानकांबाहेर सार्वजनिक वाहनांसाठी प्रवाशांच्या लागलेल्या रांगांच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी खोचक ट्विटद्वारे केंद्राला लक्ष्य केले. त्यांनी म्हटले आहे की, ‘प्रवाशांनी प्रचंड गैरसोय सहन करून सार्वजनिक वाहनांसाठी केवळ कोरोना प्रतिबंधामुळे लांबलचक रांगा लावलेल्या नाही. यामागचे खरे कारण शोधण्यासाठी आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर बघा.‘ राहुल यांनी कराच्या रूपाने खंडणी वसुली होत असल्याचे (टॅक्स एक्स्टॉर्शन) असा हॅशटॅगही वापरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.