Tata Group: टाटांच्या कंपनीला BSNLकडून मिळाली मोठी ऑर्डर; 15,000 कोटी रुपयांपेक्षा...

BSNL कडून 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची खरेदी ऑर्डर मिळाली आहे.
Tata Group
Tata GroupSakal
Updated on

Tata Group: Tata Consultancy Services Limited च्या नेतृत्वाखालील कंसोर्टियमला संपूर्ण भारतभर 4G नेटवर्क बसवण्यासाठी BSNL कडून 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची खरेदी ऑर्डर मिळाली आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे शेअर्स बीएसईवर सकाळच्या व्यवहारात जवळपास एक टक्क्याने वाढून प्रत्येकी 3,246.80 रुपये झाले कारण कंपनीच्या नेतृत्वाखालील कंसोर्टियमला BSNL कडून 15,000 कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली.

एका नियामक फाइलिंगमध्ये, कंपनीने म्हटले आहे की, "टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडच्या नेतृत्वाखालील कंसोर्टियमला बीएसएनएल, 100% भारत सरकारच्या मालकीच्या BSNL भारतभर 4G नेटवर्क बसवण्यासाठी 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची आगाऊ खरेदी ऑर्डर मिळाली आहे.

Tata Group
Gold Silver Rate: लग्नसराईत सोन्या-चांदीचे भाव स्थिर, खरेदीसाठी चांगली संधी; जाणून घ्या आजचा भाव

BSNL ला भारतामध्ये 4G लाँच केल्यानंतर त्याच्या महसुलात 20% वाढ होण्याची अपेक्षा आहे. BSNL ला 2022 मध्ये सरकारने पॅकेज दिले होते. हे पॅकेज 1.64 लाख कोटी रुपयांचे आहे.

गेल्या महिन्यात दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खुलासा केला होता की बीएसएनएलने फील्ड ट्रायलचा भाग म्हणून 200 टॉवर्स बसवण्यास सुरुवात केली आहे. ते म्हणाले की, येत्या काही महिन्यांत 4G साठी टॉवर अधिक वेगाने बसवण्याची योजना आहे.

कंपनीचे चेअरमन पी के पुरवार यांनी एका न्यूज वेबसाईटला सांगितले की, "जीओएमने एक लाख साइट्ससाठी नेटवर्क उपकरणे खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. कंपनी पुढील काही दिवसांत खरेदी ऑर्डर जारी करण्याची शक्यता आहे."

टाटा समूहाची कंपनी TCS या साइट्ससाठी 4G उपकरणे पुरवणार आहे. या ऑर्डरची किंमत सुमारे 24,500 कोटी रुपये आहे. यामध्ये सुमारे 13,000 कोटी रुपयांच्या नेटवर्क उपकरणांच्या खरेदीचा समावेश आहे.

Tata Group
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.