International Tea Day : चहाचे भन्नाट प्रकार पाहिलेत का? आसाममध्ये तर मीठाचा चहा पितात..!

चहाप्रेमींसाठी दरवर्षी १५ डिसेंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून साजरा केला जातो
Tea Day
Tea Day
Updated on

चहा हे भारतातील सर्वाधिक पसंतीचे पेय आहे. लोकांना प्रत्येक ऋतूत चहा प्यायला आवडतो. कडाक्याची थंडी सोसत ऑफीसला जाताना थोडावेळ थांबून टपरीवरचा चहा घेणे तर अद्भूत अनूभव देते. चहा हा लोकांच्या जीवनाचा भाग बनला आहे. अनेक लोकांना तर कधीही चहा प्यावासा वाटतो. अशाच चहाप्रेमींसाठी दरवर्षी १५ डिसेंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून साजरा केला जातो.

जर तुम्हीही या चहाच्या वेड्यांपैकी एक असाल तर या खास प्रसंगी आज आम्ही तुम्हाला भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी लोकप्रिय असलेल्या चहाच्या काही प्रकारांबद्दल सांगणार आहोत.

Tea Day
Humor Therapy : तणाव घालविण्यासाठी मनापासून हसा!; हास्‍य योगाच्या सरावातून होतो फायदा!

मसाला चहा

देशातल्या कोणत्याही भागात गेलात तरी सहजरीत्या मिळू शकेल असा हा मसाला चहा आहे. वेगवेगळे मसाले आणि चहापत्ती पाण्यात शिजवून उकळी आल्यावर त्यामध्ये दूध घालून हा चहा तयार होतो.

काश्मिरी कहवा

कहवा हा एक चवदार आणि अनोखा चहा आहे. जो केवळ काश्मिरी खोऱ्यात मिळतो. काश्मिरीच्या बर्फवृष्टीत हा चहा एक वेगळीच एवर्जी देतो. इतर काश्मिरी पेयांप्रमाणेच हा चहा बनवायला देखील सोपा आहे. हा चहा बनवण्यासाठी उकळत्या पाण्यात दालचिनी, केशर, वेलची आणि वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घालाव्यात.यात हिरव्या चहाची पाने अगदी शेवटी घालावी लागतात. तर गोडव्यासाठी साखरेऐवजी मधाचा वापर करतात.

Tea Day
Foods For Period Cramps : त्या 'चार' दिवसातील दुखण्यावर गुणकारी ठरतेय चॉकलेट!
काश्मिरी कहवा
काश्मिरी कहवा

दार्जिलिंगमधील चहा

भारतीय चहाप्रेमीला दार्जिलिंगमधील चहा कसा असतो हे माहिती नाही, हे क्वचितच घडेल. कारण, जर तूम्ही दार्जिलिंगला गेला असाल तर नक्कीच तिथल्या चहाच्या प्रेमात पडला असाल. भारतीयच नाही तर तिथे भेट देणारे अनेक परदेशी पर्यटकही इथल्या चहाचे दिवाने आहेत.इथल्या चहाचा रंग पांढरा, काळा, हिरवा आणि ब्राऊन या रंगांचा असतो. दार्जिलिंगमधील चहामध्ये अनेकदा तीव्र सुगंध असतो.

Tea Day
Pathaan Controversy: हा निव्वळ मूर्खपणा.. भगव्या बिकिनीवर बोलली पायल रोहतगी..
दार्जिलिंगमधील चहा
दार्जिलिंगमधील चहा

बटर टी

भारताव्यतिरिक्त नेपाळ आणि भूतानच्या हिमालयीन लोकांमध्ये बटर टी प्रसिद्ध आहे. यात दूधापासून बनलेले बटर, चहापत्ती आणि मीठापासून बनवला जातो. या चहाला तिबेटमध्ये पोचा म्हणूनही ओळखले जाते. सामान्य चहाच्या तूलनेत हा चहा चवीला थोडा खारट असतो.

बटर टी
बटर टी

निलगिरी चहा

या चहाला ब्लू माउंटन टी असेही म्हटले जाते. त्याचे मूळ पश्चिम घाटात आहे. त्याच्या तीव्र चवदार, सुगंधी आणि रंगाच्या वैशिष्ट्यांमुळे हा चहा जगातील सर्वाधिक मागणी असलेल्यांपैकी एक आहे. या चहामूळे मधुमेह प्रतिबंध, वजन कमी करणे आणि तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

निलगिरी चहा
निलगिरी चहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.