UP Teacher: द्वेषाची शाळा; जितके मुस्लिम विद्यार्थी आहेत....; शिक्षिकेच्या व्हायरल व्हिडिओमुळे वाद

up teacher muslim student
up teacher muslim studentesakal
Updated on

Teacher seen on camera telling schoolchildren to slap a Muslim boy

लखनऊ- उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील एका खासगी शाळेत घडलेल्या प्रकारामुळे वादाला तोंड फुटले आहे. मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्याला वर्गातील इतर वर्गमित्र एकानंतर एक असे चापट मारत आहेत. धक्कादायक म्हणजे शिक्षिकाच विद्यार्थ्यांना असं करायला सांगत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये शिक्षिका 'मोहम्मद यांचा मुलगा' असा उल्लेख करताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला असून शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

माहितीनुसार, खुब्बापूर गावातील हा प्रकार असून पोलिस याप्रकरणी शिक्षिकेविरोधात कारवाई करण्याच्या तयारीत आहे. शिक्षेकेचे नाव त्रिप्ता त्यागी असं असून त्या नेहा पब्लिक स्कूलच्या शिक्षिका आहेत. पोलिसांनी सांगितलं की त्यांनी व्हिडिओ पाहिला असून शिक्षण विभागाला यावर कारवाई करण्यास सांगितलं आहे. मुलगा मुस्लिम आहे आणि महिलेने धार्मिक द्वेषातून हा प्रकार केलाय का? याचा तपास सुरु आहे.

up teacher muslim student
Ajit Pawar : आम्ही विचारधारा सोडलेली नाही; अजित पवार यांचे स्पष्टीकरण; नरेंद्र मोदी, नितीन गडकरी यांचे कौतुक

मॅथेमॅटिक टेबल चुकीचा केल्याने महिला शिक्षक मुस्लिम विद्यार्थ्याला शिक्षा देताना दिसत आहे. महिला वर्गातील इतर मुलांना एकानंतर एक असं त्या मुलाला मारायला लावते. मोहम्मदांच्या मुलांकडे त्यांच्या आईने लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं, यामुळे या मुलांची अधोगती होत आहे, असं महिला शिक्षक व्हिडिओत म्हणताना दिसत आहे.

up teacher muslim student
PM Modi Xi Jinping Meet : चीनच्या विनंतीनुसारच नरेंद्र मोदी-जिनपिंग भेट

माहितीनुसार, मुस्लिम मुलाच्या वडिलांनी महिला शिक्षिकेविरोधात तक्रार करण्यात नकार दिला आहे. मी मुलाला शाळेतून काढलं असून त्याला पुन्हा शाळेत पाठवणार नाही. मला शाळेने संपूर्ण फी परत केली आहे. त्यामुळे मला हे प्रकरण पुढे वाढवायचं नाही, अशी प्रतिक्रिया मुलाच्या वडिलांनी दिली आहे. तथापि, शिक्षण विभाग शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल करण्याची तयारी करत आहे. यासंदर्भात शाळेच्या मुख्याध्यापीकेला बोलण्यात आल्याचं संबंधित पोलिसांनी सांगितलं.

up teacher muslim student
PM Modi in Bengaluru : 'जय विज्ञान, जय अनुसंधान'.. पंतप्रधान मोदी बंगळुरूमध्ये दाखल; इस्रोच्या वैज्ञानिकांना भेटणार

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करुन प्रतिक्रिया दिली आहे. निष्पाप मुलांच्या डोक्यामध्ये द्वेष पसरवला जात आहे. शाळेसारख्या पवित्र ठिकाणाला द्वेषाचा बाजार बनवलं जात आहे. शिक्षक यापेक्षा जास्त देशाचं काय वाईट करु शकतो. अशाच प्रकारचे केरोसीन भाजप देशातील प्रत्येक भागात पसरवत आहे. मुले देशाचे भविष्य आहेत. त्यांचा द्वेष करु नका. आपल्या सर्वांना एकमेकांवर प्रेम करायला हवं, असं ते म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.