National Cancer Institute : संघाची टीम चांगलं काम करत आहे - मोहन भागवत

नागपुरात आज राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्युटचं उद्धाटन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते.
Mohan Bhagwat
Mohan BhagwatSakal
Updated on

नागपूरमध्ये जामठा इथं राष्ट्रीय कर्करोग संस्थेचं उद्घाटन करण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी रुग्णालयाच्या औपचारिक उद्घाटनाची घोषणा केली. रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगपती गौतम अदानी उपस्थित होते.

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनीही रुग्णालयाची संपूर्ण पाहणी केली. विदर्भाच्या परिसरात सुरू झालेले हे कॅन्सर हॉस्पिटल सुरू झाल्यास मोठ्या लोकसंख्येला फायदा होणार आहे. सरसंघचालक मोहन भागवत यावेळी बोलताना म्हणाले, "स्वप्न पाहणे आणि ते पूर्ण करणे यात खूप फरक आहे. पण निर्धार पक्का असेल तर तो पूर्ण होतो आणि टीम तयार करून काम केलं तर ते लवकर पूर्ण होईल. संघ स्वयंसेवक असं कार्य करतात तेव्हा खूप बरं वाटतं.

पाटण्यातील विमान अपघाताचा संदर्भ देत मोहन भागवत यांनी तिथं स्वयंसेवकांनी कसं काम केलं ते सांगितलं. त्याचं कौतुक झालं. मला आवडलं.

या प्रकल्पाच्या मागे संघ उभा असल्याचे भागवत म्हणाले. इथे गरिबांची सेवा केली जाईल. उत्कृष्ट उपचार मिळेल. संघ चांगले काम करत असून यापुढील काळातही असंच सुरू राहावं, असं ते म्हणाले.

Mohan Bhagwat
Does BJP not want Eknath Shinde?: एकनाथ शिंदे भाजपला नकोसे? वरिष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण

जनतेलाही आपली जबाबदारी पार पाडावी लागेल, असं भागवत म्हणाले. उपचार स्वस्त करावे लागतील. पण ज्यांची क्षमता नाही त्यांनी मोफत उपचार करावेत पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी पैसे द्यावेत आणि ज्यांना मदत करता येईल त्यांनी हात पुढे करावा. इतर पद्धतींचा वापर करून उपचाराचा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे ते म्हणाले.

मोहन भागवत म्हणाले की, कर्करोगासारख्या आजाराशी लढण्यासाठी सर्वांनी सज्ज झाले तर विजय निश्चित आहे. शेवटी भागवत यांनी रुग्णालयाच्या उद्घाटनाची औपचारिक घोषणाही केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()