जम्मू काश्मीरमधील 'तहरिक-ए-हुर्रियत'वर सरकारने घातली बंदी; अमित शाहांनी दिली माहिती

मुस्लीम लीग जम्मू-काश्मीर (मसरत आलम ग्रुप) च्या नंतर सरकारने आता तहरीक-ए-हुर्रियत वर बंदी घातली आहे.
Tehreek-e-Hurriyat Jammu Kashmir has been declared an Unlawful Association under UAPA amit Shaha
Tehreek-e-Hurriyat Jammu Kashmir has been declared an Unlawful Association under UAPA amit Shaha
Updated on

जम्मू काश्मीरला दहशतवाद मुक्त बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान मुस्लीम लीग जम्मू-काश्मीर (मसरत आलम ग्रुप) च्या नंतर सरकारने आता तहरीक-ए-हुर्रियत वर देखील बंदी घातली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबद्दल माहिती दिली असून त्यांनी दहशतवादी कारवायांमुळे या संघटनेवर UAPA अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे.

गृहमंत्री अमित शाहांनी सांगितलं की, ही संघटना जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळं करण्यासाठी आणि इस्लामिक शासन स्थापन करण्यासाठी अवैध कारवायांमध्ये गुतली होती. हा गट जम्मू-काश्मीर मध्ये फुटीरतावाद वाढवण्यासाठी भारत विरोधी प्रचार आणि दहशतवादी कारवाया करत आला आहे. दहशतवादाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झीरो टॉलरंस पॉलिसीअंतर्गत भारत विरोधी कारवायांमध्ये सहभाग आढळलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेचे प्रयत्न हाणून पाडले जातील.

Tehreek-e-Hurriyat Jammu Kashmir has been declared an Unlawful Association under UAPA amit Shaha
सौदी अरेबियाचं नशीब पुन्हा चमकलं! तेलानंतर आता पवित्र मक्का शहरात सापडलं सोन्याचं भांडार

यापूर्वी २७ डिसेंबर रोजी गृह मंत्रालयाने मुस्लीम लीग जम्मू काश्मीर(मसरत आलम ग्रुप)वर बंदी घातली होती. गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं होतं की देशविरोधी कारवाया केल्याने या संघटनेवर UAPA अंतर्गत पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

Tehreek-e-Hurriyat Jammu Kashmir has been declared an Unlawful Association under UAPA amit Shaha
Maharashtra Politics : ठाकरे गटाचा लोकसभेच्या २३ जागांवर दावा, तर काँग्रेसकडून २२ वर तयारी सुरू; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काय?

अनलॉफुल अॅक्टिव्हीटीज प्रिव्हेन्शन अॅक्ट (UAPA) अंतर्गत केंद्र सरकार कोणत्याही संघटनेवर बेकायदा किंवा दहशतवादी घोषित करू शकते. देशात गृह मंत्रालयाकडून सध्या देशात ४३ संघटनांना दहशतवादी संघटना घोषित करण्यात आले असून त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये अनेक खलिस्तानी संघटना, लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद, लिट्टे आणि अलकायदा अशा संघटनांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.