पायथॉन-5मुळे तेजसची मारक क्षमता वाढली

डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन (DRDO)ने आपल्या ट्विटर अकाउंटवरून याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Tejas fighter jet
Tejas fighter jetDRDO
Updated on
Summary

डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन (DRDO)ने आपल्या ट्विटर अकाउंटवरून याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

नवी दिल्ली : स्वदेशी बनावटीचे वजनाला हलके लढाऊ विमान असणाऱ्या तेजसची मारक क्षमता आणखी वाढणार आहे. संशोधकांनी तेजसच्या भात्यामध्ये हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता असणाऱ्या पायथॉन या पाचव्या पिढीतील क्षेपणास्त्राचा समावेश केला आहे. या क्षेपणास्त्राच्या चाचण्या यशस्वी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तेजस हे दृष्टीपल्याड असणाऱ्या लक्ष्याचा वेध घेण्यासाठी देखील सक्षम असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Tejas fighter jet
Video : रशियाची भारताला मदत; पाठवली २२ टन वैद्यकीय उपकरणे

अत्यंत आव्हानात्मक अशा स्थितीमध्ये या क्षेपणास्त्राच्या चाचण्या यशस्वीपणे घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तेजसवर बसविण्यात आलेल्या डर्बी आणि पायथॉन या दोन्ही क्षेपणास्त्रांनी त्यांचे लक्ष्य अचूकरीत्या भेदले. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या भारतीय कंपनीनेच या विमानाची निर्मिती केली आहे. डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन (DRDO)ने आपल्या ट्विटर अकाउंटवरून याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Tejas fighter jet
कोरोनाचा कहर सुरुच; देश लॉकडाऊनच्या वाटेवर

एका मिनिटात एक हजार लिटर ऑक्सिजन

भारत कोरोनाविरुद्धची लढाई नेटाने लढत आहे. या संकटात भारताने ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. तेजस फायटरमध्ये डिफेन्स टेक्नॉलॉजीचा उपयोग करून ऑक्सिजन तयार केला जाणार आहे. ही प्रणाली ऑन बोर्ड ऑक्सिजन जनरेशन सिस्टीम (OBOGS) म्हणून ओळखली जाते. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार होणारा ऑक्सिजन नागरी हेतूसाठी वापरला जाईल. या प्रणालीद्वारे एका मिनिटात एक हजार लिटर ऑक्सिजन तयार केला जाऊ शकतो.

Tejas fighter jet
सरकारलाच लोक मरताना पाहायचेत; दिल्ली उच्च न्यायालय प्रोटोकॉलवर भडकले

काय आहे OBOGS तंत्रज्ञान?

डीआरडीओच्या म्हणण्यानुसार, ओबीओजीएस एक लाइफ सपोर्ट सिस्टीम आहे, जी खूप उंचीवर आणि हाय स्पीड फाइटर एअरक्राफ्टमध्ये उपस्थित एअरक्रूला संरक्षण पुरवते. ओबीओजीएसच्या मदतीने एलओएक्सच्या जागी विमानाच्या इंजिनमधून निघणाऱ्या हवेचा वापर करून आणि त्याच्या अणुंचा एक प्रकार असलेल्या मॉलिक्युलर सीव्ह ज्याला जोलाईट म्हणून ओळखले जाते. याला प्रेशर स्विंग एडसॉर्प्शन (PSA) तंत्रज्ञानाद्वारे वेगळे केले जाते. या प्रणालीमध्ये ऑक्सिजनसोबत दोन आण्विक चाळणीचे दोन थर असतात. ज्याच्याद्वारे एअरक्रूला सलग ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()