नवी दिल्ली : तेलंगण विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ३५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत विचारविमर्श झाल्यानंतर ही यादी जाहीर करण्यात आली. तेलंगण विधानसभेचे एकूण संख्याबळ ११९ इतके असून ३० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
तिसऱ्या यादीवर नजर टाकली तर भाजपने हुजूरनगर मतदारसंघात चेल्ला श्रीलता रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत बीआरएसच्या एस. साई डी रेड्डी यांच्याशी होईल. ज्युबिली हिल मतदारसंघात एल. दीपक रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांची लढत पूर्वाश्रमीचे क्रिकेटपटू आणि कॉंग्रेसचे उमेदवार अझरुद्दीन यांच्याशी होईल.
तसेच सिनेस्टार पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षासोबत भाजप आघाडी करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कुकटपल्ली, सेरीलिंगमपल्ली आणि खम्मम या मतदारसंघात भाजपने उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
भाजपने सनतनगर मतदारसंघात एम. शशिधर रेड्डी यांना तिकीट दिले आहे. ज्या अन्य नेत्यांना तिकीट मिळाले आहे, त्यात समा रंगा रेड्डी (लाल बहादूर नगर), पी. विजयकुमार (मेडक), पूसा रेड्डी (मुशिराबाद), व्ही. रघुनाथ (मंचेरियल), ए. ए. नाईक (असिफाबाद), एंडाला लक्ष्मीनारायण (निजामाबाद ग्रामीण), जे. संगाप्पा (नारायणखेड), आर. आर. नरसिंहा (झहिराबाद), टी. एस. रेड्डी (राजेंद्रनगर), के. एस. रत्नम (चेवेल्ला), एम. सारंगपाणी (सिकंदराबाद) आणि अश्वत्थामा रेड्डी (वनपार्थी) यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.