Telangana Election : तेलंगणा जिंकण्यासाठी सोनिया गांधींकडून मोठ्या घोषणा; शेतकऱ्यांना 15 हजार तर महिलांना मोफत...

congress sonia gandhi rahul gandhi
congress sonia gandhi rahul gandhiesakal
Updated on

हैदराबादः काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी हैदराबादजवळ एका सभेला संबोधित केलं. निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी तेलंगणासाठी सहा मोठ्या घोषणा केल्या आहेत. या महान राज्याच्या विकासाची संधी काँग्रेसला मिळावी, अशी माझी इच्छा असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या.

सोनिया गांधी म्हणाल्या की, तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. काँग्रेसचं सरकार तेलंगणामध्ये आल्यानंतर महिलांना महालक्ष्मी योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला अडीच हजार रुपये दिले जातील, महिलांना मोफत बस प्रवास दिला जाईल, असं आश्वासन त्यांनी तिलं.

तसेच शेतकऱ्यांना वर्षाकाठी १५ हजार रुपये आर्थिक मदत मिळेल. तर शेजमजुरांना १२ हजार रुपये मिळतील आणि धान पिकावर ५०० रुपयांचा बोनस मिळेल. यासह गृह ज्योती योजनेची हमी त्यांनी दिली. सर्व घरांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळेल, असं आश्वासन देण्यात आलं.

congress sonia gandhi rahul gandhi
वाघाच्या बछड्याच्या नामकरणासाठी ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी, वनमंत्र्यांनी केली बाद! अजित पवार म्हणाले कानावर हात!

सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही त्यांना ५ लाख रुपये मिळतील आणि तेलंगणा चळवळीतील लढवय्यांना २५० चौरस फुटांचा भूखंड मिळेल. युवा विकास योजनेंतर्गत विद्यार्थ्यंना ५ लाख रुपयांचे विद्या भरोसा कार्ड आणि प्रत्येक विभागात एक तेलंगणा इंटरनॅशनल स्कूल उभा करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला.

congress sonia gandhi rahul gandhi
Bus Accident : डोंबिवलीमधील गणेशभक्तावर काळाचा घाला; राजापूरला जाणाऱ्या एसटीला कोकणात अपघात

जाहिरनाम्याबद्दल सोनिया गांधींनी पुढे सांगितलं की, चेयुथा योजनेंतर्गत ४ हजार रुपये मासिक पेन्शन आणि १० लाख रुपयांचा राजीव आरोग्यश्री विमा मिळेल.

विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि त्याच्या कुटुंबाने स्वतःचं शासन स्थापित केलं आहे. त्यांना लोकांचा आवाज ऐकू येत नाहीये. निजामाप्रमाणे ते राज्य करीत असल्याचा घणाघात काँग्रेसने केला. 'आज तक'ने हे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.