हैदराबाद - तेलंगणात काँग्रेसचे सरकार आल्यास महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने पावले टाकली जातील.सामाजिक पेन्शन, एलपीजी गॅस सिलिंडरवर अंशदान आणि सरकारी बसमध्ये मोफत प्रवासाच्या माध्यमातून महिलांना ४ हजार रुपयांपर्यंत लाभ मिळेल. प्रत्येक महिन्याकाठी महिलांच्या खात्यात सामाजिक पेन्शन म्हणून अडीच हजार रुपये जमा केली जातील. सिलिंडरवर पाचशे रुपयांचे अनुदान मिळेल आणि बसच्या माध्यमातून एक हजार रुपयांपर्यंतची सवलत दिली जाईल, अशी घोषणा आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.
काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ अंबटिपल्ली गावात आयोजित सभेत बोलताना त्यांनी बीआरएस सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘‘ तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कथितरित्या केलेली राज्याची लुट परत मिळवून देण्याचा काँग्रेसने निर्धार केला आहे. तेलंगणात आमचे सरकार आले तर महिलांना दरमहा चार हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळेल. मुख्यमंत्र्यांच्या लुटीने तेलंगणाच्या महिलांना सर्वाधिक फटका बसला आहे.
यानुसार राज्यांतून एक लाख कोटी रुपयांची लूट झाल्याचा आरोप करत ते म्हणाले, बीआरएस, भाजप आणि एमआयएम हे एकत्रपणे लढत आहेत. मात्र खरा मुकाबला काँग्रेस आणि केसीआर यांच्यातच आहे. एमआयएम आणि भाजप हे बीआरएसला छुपा पाठिंबा देत आहेत. त्यामुळे या दुटप्पी सरकारला हटविण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा द्या. कालेश्वरम प्रकल्पातून केसीआर यांनी पैसा कमावला असल्याचा आरोपही त्यांनी केला. ही योजना केसीआर यांच्यासाठी एटीएमप्रमाणे आहे, असे ते म्हणाले.
मेडिगड्डा धरणाचा दौरा
अंबटिपल्ली येथील सभा होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी आज सकाळी मेडिगड्डा धरणाचा दौरा केला. या प्रकल्पाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवल्याने त्यांना परवानगी दिली गेली नाही. मात्र शेवटी परवानगी देण्यात आली.
त्यानंतर राहुल यांनी मेडिगड्डा धरणाची पाहणी केली. त्यानंतर राहुल यांनी एक्स वर पोस्ट केली.‘‘कालेश्वरम प्रकल्प हा केसीआर कुटुंबांचे एटीएम बनले आहे. मी आज मेडिगड्डा धरणाचा दौरा केला. हा तेलंगणातील कालेश्वरम उपसा सिंचन योजनेचा एक भाग असून तो भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. निकृष्ट कामामुळे अनेक खांबांना भेगा पडल्या आहेत. ’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.