SSC पेपर फुटी प्रकरणी भाजपचे तेलंगणा प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्री तेलंगणा पोलिसांनी संजय कुमार यांना करीमनगर येथील निवासस्थानाहून ताब्यात घेतले. तेलंगणात संजय कुमार यांच्या अटकेवरून भाजप आयटी सेलच्या आरोपाने केसीआर सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय कुमार यांना रात्री उशिरा ताब्यात घेतल्यानंतर संजय कुमार यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट करण्यात आले. त्यामध्ये लिहिलं आहे की, BRS सरकारमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आधी त्यांनी मला पत्रकार परिषद घेण्यापासून थांबवलं आणि आता रात्री मला अटक करत आहेत.
माझा गुन्हा एवढाच आहे की, मी बीआरएस सरकारच्या चुकीच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. मी तुरुंगात राहिलो तरी बीआरएसवर प्रश्न उपस्थित करणे थांबवू नका. असं संदेश पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी दिला आहे.
तेलंगणात प्रदेशाध्यक्षांच्या अटकेविरोधात पक्ष राज्यव्यापी आंदोलन करत आहे. बुधवारी दुपारी पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या संजय कुमार यांना वैद्यकीय तपासणीसाठी रूग्णालयात घेऊन जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी पोलीसांच्या वाहनाचा रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.