Telangana : चंद्रशेखर राव यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप TDP सोबत युती करणार?

'तेलंगणाच्या राजकारणात टीडीपी फार काळ मोठा पक्ष राहणार नाहीय.'
Telangana Politics News
Telangana Politics Newsesakal
Updated on
Summary

'तेलंगणाच्या राजकारणात टीडीपी फार काळ मोठा पक्ष राहणार नाहीय.'

Telangana Politics News : तेलंगणात (Telangana) स्वतःला बळकट करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून भारतीय जनता पक्ष आता तेलुगू देसम पार्टी (TDP) सोबत युती करू शकतो. चंद्रशेखर राव (Chandrasekhar Rao) यांना सत्तेवर येण्यापासून रोखणं हा यामागचा हेतू आहे, जी राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी (BJP) आघाडी आहे.

टीडीपी लवकरच भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीत परतणार असल्याचे संकेत मिळत आहेत. केसीआर राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याच्या तयारीत असताना भाजपनं तेलंगणात आपली पूर्ण ताकद लावलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी तेलंगणातील भाजपच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतल्यानं आणि हैदराबादमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाल्यानं भाजप तेलंगणात आपली ताकद दाखवताना दिसत आहे. केसीआरशी स्पर्धा करा, असं आवाहन पक्षाकडून करण्यात आलंय. मात्र, तेलंगणाच्या राजकारणात टीडीपी फार काळ मोठा पक्ष राहणार नाहीय. आंध्र आणि रायलसीमा भागात राहणाऱ्या लोकांचा पक्षाला चांगला पाठिंबा मिळत असून भाजपनं युतीचा निर्णय घेतल्याचं कळतंय.

Telangana Politics News
Shahaji Patil : राष्ट्रवादीनं अख्खी शिवसेना डबऱ्यात घालायचं ठरवलं होतं; शहाजीबापूंचा जयंत पाटलांवर प्रहार

32 विधानसभा मतदारसंघांवर भाजपचं लक्ष

आपल्या 'मिशन 2023' अंतर्गत भाजप एकूण 119 पैकी सुमारे 32 विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करत आहे. अभिनेते पवन कल्याणच्या (Actor Pawan Kalyan) नेतृत्वाखालील जनसेना पक्ष (जेएसपी) भाजपला जास्तीत-जास्त जागा मिळवून देऊ शकतो, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. यातील बहुतांश विधानसभा मतदारसंघ हैदराबाद आणि आसपासचे आहेत.

Telangana Politics News
'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.